हे भाजपात चाललंय तरी काय ?

जिल्हाध्यक्ष निवडणूक रद्द केल्याचा श्रेय घेत आहे

भाजप नेते तिवारी निवडणूक रद्द करा म्हणून राज्यमंत्र्याना निवेदन

घुग्घूस : भारतीय जनता पक्षाचे उत्तर भारतीय मोर्च्यांचे नेते माजी उपसरपंच संजय तिवारी यांनी दिनांक 19 डिसेंबर रोजी चंद्रपूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संपर्क मंत्री तथा उच्च शिक्षण व नगरविकास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन घुग्घुस ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम रद्द करून नगरपरिषद घोषित करा अशी मागणी केली.
एकीकडे भाजप जिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम आपल्यामुळे रद्द झाल्याचा श्रेय असतांना भाजपचाच नेत्याने राज्यमंत्र्याना निवेदन दिल्यामुळे
जिल्हाध्यक्षाला घरचा आहेर दिल्याचा नागरिकांत चर्चा आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैध, भाजप नेते महेश लठा, राष्ट्रवादी अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुला, युवक अध्यक्ष दिलीप पित्तलवार आदी उपस्थित होते.