• काही दिवसांपूर्वीच शॉर्ट सर्किटने जळाले होते घर
• राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी घर आवंटीत
चंद्रपूर : अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गरजा पूर्ण व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपापल्या मिळकतीप्रमाणे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्नही असतो. गर्भ श्रीमंताच्या गरजा सोडल्या तर गरींबांसाठी ह्या गरजा पूर्ण करणे जिकरीचे ठरते. पानावर आणून हातावर खाण्यासाठीच अख्ये आयुष्य खर्ची होते.
मग निवाऱ्याचा प्रश्न हा आयुष्याच्या शेवट पर्यंत सुटत नाही. त्यांना आज होईल उद्या पूर्ण होईल अशा स्वप्नातच निवाऱ्याचा आनंद घेता येतो. काही व्यक्ती अजूनही सामाजिक बांधिलकी जपत लोकांना मदत करतात. मग कुणी पैशाची असो की वस्तुंची.
मात्र घुग्घूस येथे शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत भागरथाबाईचे घर जळून खाक झाले. आदिवासी समाजातील युवकांनी खाण्या – पिण्याची व्यवस्था केली. भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पाच हजार रुपये अर्थ दिले.
मात्र तिच्या डोक्यावरील छत गेल्याने तीला उघड्यावर राहावे लागले. ती आयुष्याच्या शेवट पर्यंत आपली निवाऱ्याची गरज पूर्ण करू शकणार नाही. आणि शासकीय यंत्रणा आवश्यक त्यावेळी तिला निवारा उपलब्ध करून देवू शकणार नाही. यामुळे चिंतेत असलेल्या माऊलीला सामाजिक बांधिलकीतून राजकारणातील एका भल्या माणसाच्या आधाराने भागरथाबाईचा निवारा आता आकार घेऊन निर्माण झाला आहे.
घुग्घूस येथील अमराई वॉर्डातील वयोवृद्ध भागरथाबाई सिडाम ह्या निवासी. परंतु काही दिवसांपूर्वी या महिलेचे घर शॉर्ट सर्किटमुळे जळाले. यात डोक्यावरील छत पूर्णत: जळून खाक झाले. संसारोपयोगी साहित्य जळाले. संसाराचा गाडा एका घटनेने विस्कळीत झाला. त्यामळे त्या ती माऊली उघड्यावर राहण्याची वेळ आली. घर अतिक्रमणात असल्याने भागरताबाई कुठल्याही प्रकारची शासकीय मदद मिळू शकली नाही. आयुष्य जगताना ही वयोवृद्ध महिला हतबल ठरली होती. काही स्थानिक लोकांनी थोड्याफार मदतीसाठी हात पुढे केला. काही युवकांनी अन्न धान्य देऊन त्या महिलेला मदत केली. परंतु आयुष्याच्या निवाऱ्याचा मुख्य प्रश्न भागरथाबाईला चिंतेत टाकणारा होता. उघड्यावर कसे राहायचे, कधीपर्यंत राहायचे असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत होते. भागरथाबाईची निवाऱ्याची धडपड घुग्घूस येथील काँग्रेसचे अध्यक्ष राजु रेड्डी यांच्या कानावर पडली. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी त्या महिलेला मदत करायची असा निश्चय केला. त्यांनी भेट घेऊन भागरथाबाईच्या स्वप्नातील घराला आकार देण्याचे शब्द त्या महिलेला दिला.
भागरथाबाईच्या निवाऱ्याला त्याच जागी आकार देण्यास सुरूवात केली बांधकामाला सुरूवात होवून निवारा आकारला जातोय. निवारा जसा जसा आकार घेत होता तसं तसा भागरथाबाईच्या चेहऱ्यांवरील हास्य जीवन जगण्याला बळ देत होता.
आता प्रत्यक्षात निवाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले असून कायमस्वरूपी घराची इच्छा देखील पूर्ण झाली आहे. आयुष्याला शेवटच्या क्षणीची इच्छा पूर्णत्वास गेली असल्याने भागरथाबाईच्या चेहऱ्यावरील समाधान झळकताना दिसते आहे.
आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या विकासासाठी अर्पण करणाऱ्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी सामाजिक बांधिलकीने भागरथाबाईच्या हातात घराच्या चाव्या देतांना राजू रेड्डी यांचे ही मन भरून आले आपल्या हातून घडलेले कार्य त्यांनाही समाधान देणारे ठरले आहे.
याप्रसंगी भागरथा बाई सिडाम,कामगार नेते सैय्यद अनवर, दीपक पेंदोर, बालकिशन कुळसंगे, रोशन दंतलवार, लतीश आत्राम, मनीष आत्राम,शैलेश सलामें, अरविंद किवे हे उपस्थित होते.