चंद्रपूर महानगरपालिके मधिल “ दलित वस्ती निधी ” वितरणामध्ये धांदली करणाऱ्यावर कडक कारवाई करा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 बहुजन समाज पार्टी अध्यक्ष मुक्कदर मेश्राम यांची मागणी

चंद्रपूर महानगरपालिकेतील शहर अभियंता यांचा मध्ये मनमानी कारभार चालत आहे. मनपा प्रशासनाकडे पालिकेच्या विकास निधी येतो त्याचे वितरण करण्याचे कार्य महानगरपालिकेतील शहर अभियंता सांभाळत आहेत. कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला न विचारता आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना काम वितरीत करीत असतात. त्यामुळे चंद्रपूरात काही वार्डातच कामे दिसतात बाकी वार्डात विकास कामे दिसत नाही.

एवढेच नव्हे तर दलित वस्ती निधी चे वितरण सुद्धा करतांना भेदभाव केला आहे. त्यामुळे ह्या प्रकरणाची चौकशी करण्यात येण्याची मागणी करण्यात येत आहे. डॉ . बाबासाहेब आम्बेडकर प्रभाग क्र . १७ हा चंद्रपूरातील गरीब, मोल मजूरीची कामे करुन उदरनिर्वाह करणारा प्रभाग आहे. या प्रभागात रोड, नाली, लाईटची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात तर या वाडांत सर्व सामान्य वार्ड वासीयांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. चार – पाच दिवसाआधी पावसाने चंद्रपूरात थैमान घातले. त्यामुळे वार्ड वासीयांच्या घरात पाणी शिरले होते. वार्डातील जनतेने प्रभागाचे नगरसेवक श्री.अनिल रामटेके यांचेकडे नाली व रस्ता बनविण्याची मागणी केली.

ती मागणी रास्त असल्यामुळे वार्ड वासीयांचे निवेदन बनवून त्याची फाईल फाईल शहर अभियंता महेश बारई ह्यांचेकडे दिली असता ती फाईल श्री.महेश बारई यांनी अक्षरशा फेकुन दिली. सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.