भाजपा इतर पक्षातील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

चंद्रपूर : चिमुर विधानसभा क्षेत्रातंर्गत येणाऱ्या ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध गावांतील भाजपा पक्षाचे व विविध पक्षातील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी आपआपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत ब्रम्हपुरी येथील गोसेखुर्दच्या विश्रामगृहात 20 आँगस्ट रोजी शुक्रवारी प्रवेश केला आहे.

सदर कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला फार मोठे बळ मिळणार आहे. वाढती महागाई व संपुर्ण देशात भाजप नेत्यांकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे ग्रामीण भागात भाजप विरूद्ध प्रचंड असंतोष आहे.

काँग्रेस पक्ष प्रवेश प्रसंगी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, गटनेता विलास विखार, जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जि.प.सदस्या स्मिताताई पारधी व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

धनराज मुंगले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पक्ष प्रवेशात बेलगाव येथील सरपंच सुधीर पिलारे, बेलगाव येथील माजी उपसरपंच गुलाब वाघधरे, सोनेगाव येथील माजी सरपंच भिमराव वंजारी, भीमराव मेश्राम, मनोज दोनाडकर, विवेक पिल्लेवान, रामचंद्र राऊत, दिगंबर दोनाडकर, राजू राऊत, नशिकेत कांबळी, गिरीधर भाजीपाले, दिलीप सेलोकर, किशोर नंदर्धने, केवळराम मिसार, संदीप ठाकरे, संदीप गुरुपुडे, महेश कामडी, देवानंद लोखंडे, संदीप राऊत, कृष्णा मडावी, संजू ठाकरे, विठ्ठल अवसरे, विनोद बारसागडे, अंन्नाजी दोनाडकर, विजय राऊत, विक्रम डांगे, मिथुन दिघोरे, सोनेगाव येथील माजी सरपंच भिमराव वंजारी, वेंकटेश भाजीपाले, प्रभाकर देशमुख, प्रभाकर दोनाडकर, वसंत आंबवणे, नितीन मेश्राम, गंगाधर देशमुख, प्रशांत देशमुख, प्रफुल नांदणे, शाश्वत मोटघरे,अविनाश ढोरे, प्रशांत पारधी, अरुण देशमुख, जनार्दन बांगरे, उत्तम नाकतोडे, राजू पिलारे, गोविंदाजी ढोंगे, केवळराम मिसार यांसह इतर अन्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.