माजी नगराध्यक्ष तोटावार यांना हृदयविकाराचा झटका

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

प्रकृती चिंताजनक, नागपूर येथे उपचार सुरू

वणी : माजी नगराध्यक्ष तथा कोळसा व्यवसाईक सतीश तोटावार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून नागपूर येथे त्यांचे वर उपचार सुरू आहे.

सतीश तोटावार हे नेहमी प्रमाणे सकाळी जिम मधून सराव करून घरी आले.त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते नागपूर येथील अरनेजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

त्यांची एन्जोग्राफी करण्यात आली मात्र काही वेळातच त्यांना मेंदूचा झटका आल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांचेवर उपचार सुरू आहे