चड्डा ट्रान्सपोर्टचे ट्रक जाळणाऱ्या दोघां आरोपींना घुग्घुस येथून अटक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◆ जळीत प्रकरणातील ऐकून चार आरोपी अटकेत एक फरार; शिरपूर पोलिसांची कारवाई

वणी ( यवतमाळ) : मुंगोली कोळसा खाणीत रविवार दि.4 ऑक्टोबरला रात्री 9 वाजताच्या दरम्यान 5 अज्ञात आरोपीनी कोळशाचा ट्रक जाळला होता.गेल्या 15 दिवसापासून संशयित आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते.सोमवारी शिरपूर पोलिसांनी यासिन खान पठाण वय 30 वर्ष रा. सुभाष नगर घुग्घुस, शहानवाज पटेल हबीब वय 34 वर्ष रा. नकोडा या दोघांना घुगूस येथून ताब्यात घेतले आहे.

चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या MH-34-BG-0862 क्रमांकाचा ट्रक पैनगंगा कोळसा खाणीतुन कोळसा घेऊन घुगूस रेल्वे सायडिंग वर येत असतांना मंगोलो चेक पोस्ट क्र 2 वर अज्ञात पाच तरुणांनी ट्रक थांबवून चालकाला खाली उतरविले त्याला धमकी देऊन पेट्रोल टाकून ट्रकला आग लावली होती या आगीत ट्रकचा कोळसा झाला होता.

याबाबद शिरपूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करून ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राम कांडूरे यांनी तपासाला सुरवात केली. वेकोली चेक पोस्ट वरील CCTV बंद असल्याने पोलिसां समोर तपासाला अडचण निर्माण झाली होती.

आरोपी शिरपूर पोलिसांच्या रडारवर येताच पोलिसांनी तेलंगणा राज्य व औरंगाबाद येथे आरोपीच्या शोधार्थ दोन पथके पाठवली होती मात्र पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते.दि 18 ऑक्टोबर ला या दोन संशयित राहुल घोरपडे व शीनु रामटेके हे दोघे घुग्घुस ला आले असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राम कांडूरे यांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले असून सध्या एक आरोपी फरारीत आहे.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleचंद्रपूर जिल्ह्यातील वाहतुकदारांच्या वाहतूक भाड्यात दरवाढ करावी
Editor- Manoj kumar Kankam 9823945554/ 9423845554