चंद्रपूर : आज शुक्रवार 23 जुलै रोजी दुपारी एक वाजता घुग्घुस येथून जवळच असलेल्या उसगाव येथे शेतात बैल चारण्यासाठी सुधाकर मोतीराम मंगाम वय (४८) वर्ष हा गेला असता मुसळधार पाऊस सुरु झाल्याने तो झाडा खाली थांबला होता तेव्हा वीज झाडावर कोसळल्याने तो जखमी झाला.
जखमी अवस्थेत शेजारील नागरिकांनी त्याला घुग्घुस येथील डॉ. सुरेश कोल्हे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी भार्ती केले यात शेतमजूर सुधाकर मोतीराम मंगाम थोडक्यात बचावला.
उसगाव येथे बापूराव ठाकरे यांची शेती आहे त्यांच्या कडे तो शेतमजुराचे काम करतो नेहमी प्रमाणे आज तो बैल चारण्यासाठी शेतात गेला होता परंतु विजेच्या कडाक्यासह मुसळधार पाऊस सुरु झाल्याने त्याच्या अंगावर वीज पडून तो जखमी झाला.
मागील तीन दिवसा पासून घुग्घुस परिसरात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहे.