अवैध धंद्यावर आळा घाला ; यंग चांदा ब्रिगेडची निवेदनातून मागणी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यात तंबाखू व दारूबंदी असून सुद्धा दारू, ब्राऊन शुगर, गांजा, सुगंधित तंबाखू, मटका असे अवैध धंदे चंद्रपूर येथील वार्डा – वार्डात सुरु आहे जोमाने विक्रीही सुरुच आहे. परिणामी युवावर्ग याच्या आहारी गेली आहे. कुटुंब उध्वस्त होत आहे. कुटुंबात भांडणे होत आहे. नागरिकांना याचा त्रास होत आहे.

भांडणामुळे महिलांनाही त्रास होत आहे. त्यामुळे विघातक घटनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारीत दारू, आमली पदार्थ विक्री सुरु असल्याने कोरोनाची लागण नागरिकांना होत आहे.

त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यावर कठोर कारवाही करण्यात यावी. अशी मागणी पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना निवेदनातून यंग चांदा ब्रिगेड केली आहे.
निवेदन देताना यंग चांदा ब्रिगेड शहर संघटक विलास वनकर, रशीद हुसैन, सलीम शेख, कलाकार मल्लारप, विलास सोमलवार, प्रतीक शिवणकर उपस्थित होते.