घुग्घुस : गुरुवार 24 जून रोजी सकाळी 12 वाजता दरम्यान घुग्घुस येथील तहसील कार्यालया समोर राष्ट्रीय ओबीसी महासंघ घुग्घुसच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आले.
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी. ओबीसीचे विविध क्षेत्रातील आरक्षण कमी करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण सध्या रद्द झाले आहे.
24 जूनला राज्यभर जिल्हाकचेरी व तहसील कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोकभाऊ जिवतोडे यांनी दिली होती त्याअनुषंगाने हे निदर्शने करण्यात आले.
याप्रसंगी आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच, उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो, ओबीसी जिंदाबाद अशी प्रचंड नरेबाजी, घोषणाबाजी करण्यात आली. चंद्रपूरचे तहसीलदार सचिन खंडाळे यांना सर्वपक्षियांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी घुग्घुस जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विठोबा पोले, भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, काँग्रेस नेते जावेद सिद्दीकी, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रेमलाल पारधी, नारायण ठेंगणे, शिवसेना नेते बंटी घोरपडे, काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, शिवसेना कंत्राटी कामगार सेना उपजिल्हा प्रमुख किशोर बोबडे, युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप पिट्टलवार, घुग्घुस काँग्रेस महिला आघाडीच्या संगीताताई बोबडे, जनाबाई निमकर, काँग्रेसचे गिरीश कांबळे, कामगार नेते सय्यद अनवर, मधुकर मालेकर, शिक्षक चंद्रशेखर बोबडे, अरविंद आसुटकर, विनय बोढे, नामदेव मोरे उपस्थित होते.