पोर्णिमा रंगारी इंडिया बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवार्डने सन्मानित

0
328
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

सिनेतारीका करिश्मा तन्ना यांच्या हस्ते पुरस्कार

चंद्रपूर : आराध्या ब्यूटी असोसिएशनच्या वतीने इंडिया बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवार्डने आयोजित नागपूर येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत चंद्रपूर येथील निवासी पोर्णिमा रंगारी ( संचालिका: पुनम ब्यूटी पार्लर, वडगाव, चंद्रपूर) या इंडिया बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवार्डच्या मानकरी ठरल्या असुन त्यांना सिनेतारीका करिश्मा तन्ना यांच्या वतीने इंडिया बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवार्ड बहाल करण्यात आला.
याप्रसंगी हुस्न्न मल्लिका डिंपल सेठ ( अहमदाबाद ) कार्यक्रमाचे जज, जैम सेन ( मुंबई ) स्विंग्धा पुरोहित ( गोंदिया ) तसेच कार्यक्रमाचे आयोजक, आशिष राधा ( सोनी ), दीव्य हर्ष, आर्यन कल्पना, काजल, रेणू , बबिता, आकांक्ष, साक्षी, शितल, निलू, जाकिया, मुमताज, हिमानी, सुरुची, रूबी, रिता, खुशी इत्यादीसह नागपूर येथील प्रतिष्ठीत नागरिकांनी पोर्णिमा रंगारी यांना अवार्ड मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
पोर्णिमा रंगारी यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रविण रंगारी ( पती ), सौ. विमल नगराळे (आई ), कीशोर नगराळे ( वडील ) व त्यांचे भाऊ-बहीण यांना देतात.
या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रशिक्षकांनी विविध बाबींचा विचार करून या स्पर्धेमध्ये बेस्ट मेकअप स्पर्धेमध्ये निवड करीत पोर्णिमा रंगारी हिला विजय घोषित केले.