BREAKING : लॉयट मेटल्स कंपनीच्या विज निर्मितीचा पाणी पुरवठा बंद

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• बिगर सिंचनाचे कंपनीकडे सुमारे 148.75 लक्ष बिल थकीत

• सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंत्याची धडक कारवाई

चंद्रपूर : घुग्घूस येथील लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी कंपनीच्या विद्यूत निर्मितीकरिता वापरात येणा-या पाण्याचे थकीत बिल न भरल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी पाणी पुरवठा बंद करून पाणी पुरवठा करणा-या कार्यालयाला सिल ठोकले आहे. ही कार्यवाही दुपारपासून लॉयड मेटल्स कंपनी कार्यालयात करण्यात आली. या कारवाईमुळे औद्योगित क्षेत्रात खळबळ उडाली लॉयड मेटल्स कंपनी कोट्यवधींचे बिल थकले आहे.

घुग्घूस परिसरात औद्योगिक क्षेत असून येथे विविध कंपन्या उत्पादन करीत माला पुरवठा इतरत्र करतात. लॉयड मेटल्स ही कंपनी अनेक वर्षांपासून या ठिकाणी कच्चा लोहा बनविण्यासाठी कार्यरत आहे. याठिकाणी बनविलेला लोहा हा इतरत्र पाठविल्या जातो. शेंकडो कामगार याठिकाणी कार्यरत आहेत. वेगवेगळ्या पाळी कंपनीत काम चालते. कंपनीचे या ठिकाणी उर्जा निर्मिती केंद्र असून या ठिकाणी विज निर्मिती करून कंपनीकरिता त्याचा उपयोग केला जातो. विज निर्मिती करिता पाणी हा वर्घा नदी आणि अनेक वर्षापासून बंद असलेल्या डब्लू सिएल कंपनीच्या खदाणीतील खोल खड्यातून ही कंपनी घेत आहे. मात्र मागील दहा वर्षांपासून या कंपनीने औदयोगिक क्षेत्रासाठी वापरात येणारे सिंचनाचे बिल भरले नाही. त्यानंतरही पाणी राजरोसपणे पापरणे सुरूच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा चंद्रपूर चे उपविभागीय अभियंता यांनी वेळोवेळी पत्राद्वारे बिल भरणाकरण्याबाबत सुचना केल्या आहेत. त्यांनतरही कंपनीचे त्याकडे दर्लुक्ष करून बिल न भरता पाणी घेऊन विज निर्मिती सुरूच ठेवली आहे. अखेर आज गुरूवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यानी कंपनी विरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला. आज दुपारपासून कंपनी व्यवस्थपनाला बिल भरण्यासाठी अवगत केले परंतु नेहमीप्रमाणे त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर पाणी पुरवठा करणा-या नदीकाठावरील कंपनीच्या कार्यालयाला सिल ठोकून पाणी पुरवठा कायमचा बंद केला आहे.

कंपनीकडे सुमारे 148.75 लक्ष रूपये बिल आहे. थकीत बिल असतानाही मागील दहा वर्षांपासून कंपनी बिल अदा न करता विज निर्मिती करीत होते. आजच्या कारवाईमुळे विज निर्मिती प्रकल्पाचा पाणी थांबलेला आहे. त्यामुळे विज निर्मितीवर परिणाम होणार आहे. शिवाय विजेमुळे कंपनीच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.

उपविभागीय अभियंता डी.एन. मदानकर यांचे नेतृत्वात त्यांचे चमू शाखा अधिकारी एस.डी. वर्मा, एस.बी. गावंडे, एम.एस. मोदक, एस.के. हस्तक, पी.ई. मत्ते यांनी पाणी पुरवठा बंद करून कंपनीला दणका दिला आहे. शिवाय एका पत्राद्वारे लॉयड मेटल्स कंपनीला आपण वारंवार सुचना देवुन सुद्धा 148.75 लक्ष थकबाकीची रक्कम भरली नाही. त्यामुळे आपला पाणी पुरवठा बंद केला आहे. आपणाकडुन पुर्ण पाणीपट्टी थकबाकीची रक्कमेचा भरणा केल्याशिवाय पाणीपुरवठा करण्यात येणार नाही इशाराही देण्यात आलेला आहे. यामुळे घुग्घूस औद्योगिक क्षेत्रात उद्योग जगतात खळबळ उडाली आहे.