माजी अर्थमंत्र्यांच्यां बहीण व मेव्हण्याचा अपघातात मृत्यू

0
1139

• कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मातोरी जवळ अपघात

चंद्रपूर : भाजपाचे नेते तथा राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि मेहुणे यांच्या वाहनाला कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा मातोरीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चूलत बहीण ममता तगडपल्लेवार आणि भाऊजी विलास तगडपल्लेवार आणि भाऊजी जागीच ठार झाले आहे. ही दुर्दैवी घटना काल बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.

चकलांबा येथून जवळच असलेल्या मातोरी तिंतरवणी च्या दरम्यान सायंकाळी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहीण ममता तगडपल्लेवार आणि मेव्हणे विलास तगडपल्लेवर हे पुसद येथून दोघे स्वतःच्या वाहनाने स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. मात्र गाडी क्रमांक एम एच 29 आर 42 30 कार जात असताना पुलावरून खाली कोसळली. यामध्ये हे दोघे पती-पत्नी ठार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील कारवाई सुरू आहे.