घुग्घूस शहरात भुरट्या चोरट्या सुळसुळाट

0
637

घुग्घूस : येथील चंद्रपूर -रस्त्यावरील MSEB कार्यालयाजवळ अमिषा लेडीज कलेकशन्स या नावाचे दुकान असून बुधवारच्या दुपारी 5.15 वाजता दरम्यान एक बत्तीस वर्षाचा युवक व त्याच्या सोबत तेरा वर्षाचा मुलगा दुकानात आला व त्यांनी अंडरगारमेंट्सची मागणी केली असता दुकानदार अंडरगारमेंट्सचा डब्बा घेऊन येत असताना अज्ञात व्यक्तीने काउंटर मध्ये हात टाकून पैसे काढले नंतर दुसऱ्यांदा त्यांनी काउंटर मध्ये हात टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता तो दुकान मालकाला दिसला व पसार झाला गुरुवारला सीसीटीव्ही फुटेजची पाहण्यात आले असता पैसे चोरताना दिसत आहे यामुळे सीसीटीव्ही मधून फुटेज काढून व्हॉटसाप ग्रुपवर वायरल केले असता त्याचे नाव अरविंद पांडे, असून तो डॉ. दास दवाखान्याजवळ भाड्याच्या घरी रहात असल्याचे कळते.

तरी पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी दुकान मालक सौ.मोहना खडसे यांनी केली आहे.