BREAKING : वरातीचा ट्रक उलटला; चार जण जागीच ठार

0
2187
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• 14 व-हाडी गंभीर, जखमींना चंद्रपूर रूग्णालयात हलविले

• सिंदेवाही जवळील कच्चेपार जवळ घडला अपघात

• रत्नापूर येथून लग्न आटोपून परत जात होता व-हाड्यांचा ट्रक

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथून लग्न आटोपून एकारा येथे परत जात असलेल्या व-हाडाच्यास ट्रकचा अपघात होवून चार व-हाडी जागीच ठार झाल्याची घटना आज गुरूवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली आहे. तर 14 व-हाडी गंभीर जखीमी त्यांना चंद्रपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. सिंदेवाही मेंडकी मार्गावर कच्चेपार नर्सरीजवळ हा अपघात घडला आहे. या घटनेने आनंदाच्या क्षणांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

सिंदेवाही पासून 21 कि.मी.अंतरावर ब्रम्हपुरी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील एकारा(भूज) असून आज गुरूवारी 25 फेब्रुवारी ला सुभाष एकनाथ अरसोडे यांच्या मुलाचा विवाह सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील जगदीश लोंडे यांच्या मुलीशी नियोजीत ठरले होते. वराकडील मंडळी ट्रक आणि इतर वाहनाने सकाळीच रत्नापूर येथे पाहुण्यांना घेऊन पाहेचले होते. लग्नांतील विविध सोपस्कार पार पाडल्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास विवाह पार पडला. जेवनानंतर दुपारी व-हाड्यांनी भरलेला एम एच 31 पि.क्यू. 3915 क्रमांकाचा ट्रक एकारा गावाल पाठविण्याकरिता सोडण्यात आला. एक वाजताच्या सुमारास ट्रक सिंदेवाही मेंडकी मार्गाने निघाला होता. दरम्यान सिंदेवाही पासून 10 कि.मी. अंतरावरील कच्चेपार गावालतच्या नर्सरीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून गंभीर अपघात घडला. यामध्ये रघुनाथ मारोती कोराम (वय40) मु. एकारा, साहील विनोद कोराम (वय 14) मु. एकारा, कविता संजय बोरकर (वय 30) मु. अडेगाव ता. साकोली,जि.भंडारा, रीना घनश्याम गहाणे (वय 27) मु. शिवणपायली ता. चिमूर आदी चार जण जागीच ठार झाले तर जखमी मध्ये आलीशा नंदकिशोर उईके(6), कोमल गणपत उईके(21), मंजूषा पांडूरंग कोटनाके (60), निशा राजेराम कोराम (13), देवराम सखाराम अरगडे (42), यशवंत नानाजी मेश्राम (42), विशाखा रघूनाथ कोराम (15), अश्विनी रघूनाथ कोराम (32), पवन प्रकाश ठिकरे (12), नयन प्रकाश ठिकरे (14),वनिता बाबुराव बन्सोड (60), सर्व मु. एकारा, हेमंत घनश्याम गहाणे (दीड वर्ष),मु. शिवणपायली, कविता चक्रधर बोरकर (30) मु. वासेरा, विनोद जयराम छनफणे (38) मु. गंगासागर हेटी यांचा समावेश आहे. ट्रक चालक वैभव सहारे मु. एकारा हा मद्यप्राशन करून असल्याने त्यांचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचे बोलल्या जात आहे. या ट्रक मध्ये सुमारे 50 व-हाडी बसले होते अशी माहिती आहे.

सदर अपघाताची माहिती होतास सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी जावून जखमींना सर्वप्रथम सिंदेवाही येथ्थे प्राथमिक उपचाराकरिता हलविले. त्यांनतर काही गंभीर असलेल्या व्यक्तींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. तसेच किरकोळ जखमी इतर व-हाड्यांना इतर वाहनांनी गावी पोहचविण्याची कायर्वाही पोलिस प्रशासनाने सुरू केली होती. या अपघाताच्या घटनेते चार जण जागीच ठार झाल्याने आणि काही गंभीर जखमी असल्याने आनंदाचा क्षण असलेल्या विवाह सोहळ्यावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.