घुग्घुस : येथील बस स्थानक परिसरातील शुभम पेट्रोल पंप हे अपघाताला चालना देत आहे. हा परिसर गजबजलेला असून या महामार्गावर संपूर्ण वेकोली वसाहतीतील नागरिक व शहरातील नागरिक आवागमन करीत असतात रेल्वे ट्रॅकला लागलेल्या या पेट्रोल पंपा वर मोठं – मोठे हाइवा वाहन विरुद्ध दिशेने डीजल टाकून निघतात व मोठं – मोठया वाहनांच्या रांगेमुळे संपूर्ण ट्राफिक जाम होत असते.
आज दुपारच्या सुमारास डीजल टाकणाऱ्या वाहनांमुळे ट्राफिक जाम झाल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी पेट्रोल पंप मालकाला धारेवर धरले घुग्घुस पोलिसांना बोलावून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. हे पेट्रोल पंप अगदी रस्त्यावर असल्याने व अपुरी जागेवर असल्याने हा पंप बंद करण्यासंदर्भात उच्चस्तरीय तक्रार करण्यात येणार असून सोबत जनहित याचिका ही दाखल करण्यात येणार आहे.
या पंपामुळे झालेल्या अपघातात नागरिकांचा जीव गेल्यास पंपाच्या मालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्षांनी केली आहे.