चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विविध शक्कल लढवून तालुक्यातील दारू तस्कर दारु तस्करी करण्यात यशस्वी ठरत असताना काल रात्रपाळी पोलिसांनी सीमा बंदी साठी करण्यात आलेल्या गस्ती दरम्यान दोन युवकांना दारु तस्करी करताना अटक करून धडक कारवाई केली.
सध्या कोरोना या महामारी संकटामुळे संपूर्ण राज्यात टाळेबंदी करण्यात आले आहे. अशा भयंकर परिस्थितीतही दारू तस्करांनी अधिक पैसे मिळवण्याच्या मोहात नजीकच्या तेलंगणा राज्यातील दारू तस्करांशी साटेलोटे करून दारू तस्करी व विक्रीचा गोरख धंदा चालविला अशातच काल रात्री गस्ती दरम्यान भंगाराम तळोधी वीट प्रमुख पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले व सहकारी हे गस्त करीत असताना दोन युवक संशयित रित्या आपल्या दुचाकी वाहनावर पोत्यात काही साहित्य भरून भंगाराम तळोधी मार्गे गोंडपिपरी कडे येत असताना निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना धानापूर गावाजवळील चेक वेंकटपुर येथे अडवून त्यांची चौकशी केली असता विदेशी दारू च्या दहा पिढ्या अंदाजी किंमत 90 हजार दोन मोबाईल अंदाजे किंमत दहा हजार व एक मोटर सायकल अंदाजे किंमत तीस हजार असे एकूण एक लक्ष तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपीं रोशन नंदू रामटेके 23 इंदिरा नगर वार्ड ,आशिष मुरकुटे वय 28 भगतसिंग वार्ड दोन्ही रा. गोंडपिपरी यांना अटक केली असून सदर दारुही गोंडपिंपरी येथील दारू विक्रेता प्रदीप विटेकर या विक्रेत्याला पोहोचता करण्यात येण्याची माहिती मिळाली असून त्याची वही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई गोंडपिपरी ठाणेदार संदीप धोबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले पोलीस कॉन्स्टेबल शरद कापसे, पो. कॉ. शालिक, विलास, जमादार पवार यांनी पार पाडली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.