सौ.नीतूताई चौधरी यांचे बलिदान दिनी तरुणाईला आवाहन
चंद्रपूर : प्रतिष्ठित घराण्यात जन्म घेऊनही राष्ट्रभक्त सावरकर यांच्या प्रखर देशभक्तीने प्रेरित होऊन हिंंदू महासभेत शामील होणारे प्रखर देशभक्त डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिना निमित्तानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह अमराई वार्ड नं.2 घुग्घुस येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली..
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ.नीतूताई विनोद चौधरी माजी सभापती (महिला व बालकल्याण) जि.प.चंद्रपूर
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ.वैशालीताई ढवस माजी.ग्रा.पं.सदस्या सौ.नंदाताई कांबळे माजी ग्रा.पं.सदस्या डॉ.सुनिल कुमार राम माजी अध्यक्ष (भाजपा उत्तर भारतीय आघाडी) हेमंत उरकुडे
उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष नीतूताईं चौधरी यांनी डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा प्रखर राष्ट्रप्रेमावर आपले विचार मांडतांना सांगितले की , डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी इंग्लंड वरुन बॕरीस्टर पदवी घेऊन भारतात परतले तेव्हा येथिल परिस्थिती पाहून ते व्यथित झाले.त्यांनी वयाच्या 33 व्या वर्षी कलकत्ता विश्वविद्यालयाचे कुलगुरु पद स्विकारले परंतु त्यांच्या मनातील राष्ट्रप्रेम त्यांना स्वस्थ बसु देत नव्हते. सावरकरांकडून राष्ट्रभक्तीची व राष्ट्रसेवेची प्रेरणा घेऊन त्यांनी हिंदू महासभेत सक्रिय सहभाग घेतला…
डॉ. मुखर्जी यांनी जम्मू कश्मीर ला भारताचे अभिन्न अंग मानले होते. त्याचवेळी त्यांनी जम्मु कश्मीर मधिल झेंडा , संविधान आणि वजीरे-आलम(पंतप्रधान) यांचा प्रखर विरोध केला. त्यांनी 370 धारा समाप्त करण्यासाठी जोरदार समर्थन केले . आॕगस्ट 1952 च्या जम्मू कश्मीर मध्ये निघालेल्या रॕलीला संबोधित करताना एकच संकल्प केला की , जम्मू कश्मीर मधिल 370 हटवून एकच भारतीय संविधान लागू करेन यासाठी मला माझे बलिदानी द्यावे लागले तरी चालेल …
त्याचवेळी जम्मू कश्मीर सरकार द्वारा त्यांना 40 दिवसांची कैद झाली होती आणि त्याच दरम्यान 23 जून 1953 ला त्यांचे रहस्यमय रित्या मृत्यू झाला..
त्यांचे बलिदान भारतातील प्रत्येक नागरिकांना प्रेरणा देणारे होते. आजही त्यांच्या नावाने सुरु असलेल्या प्रत्येक वाचनालयातून त्यांचे विचार वाचायला मिळतात अश्या प्रखर राष्ट्रभक्त , देशभक्त डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करुन त्यांचे विचार अंगिकारण्याचे उपस्थितांना आवाहन केले ..
कार्यक्रमाचे संचालन श्री.विनोद चौधरी जिल्हा उपाध्यक्ष वाहतूक आघाडी यांनी तर आभार श्री.तुलसिदास ढवस यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. ललित होकम , रवी चुने , दिनेश बोरपे , स्वप्नील इंगोले , गणेश कुटेमाटे , विनोद जनजीरे यांनी अथक परीश्रम घेतले.
कार्यक्रमाला स्थानिक गुरुदेव सेवा भजन मंडळी व गावकरी मंडळी उपस्थित होते.