ऐतिहासिक पठाणपुरा गेट समोर मूक निदर्शने करीत कार्यवाही ची मागणी
चंद्रपुर : राजस्थान मधील पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते ट्री मैन ऑफ इंडिया श्री विष्णु लांबा व त्यांचे सहकारी यांचेवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या तीव्र निषेध करीत मूक निदर्शने करण्यात आली.
मागील हप्तात ट्री मैन ऑफ इंडिया नावाने प्रसिद्ध असलेले श्री विष्णु लांबा व त्यांचे सहकारी यांचेवर गावातील काही असामाजिक तत्वाकडून शस्त्राद्वारे हल्ला करण्यात आला होता. राजस्थान मधील टोंक जिल्ह्यातील त्यांचे लांबा गावात ही घटना झाली, त्यात विष्णु लांबा गंभीर जखमी असून त्यांचे बचाव करण्यास आलेल्या सहकारी वर सुद्धा हल्ला झाल्याने ते सुद्धा गंभीर असून कोमात असल्याचे कळते. ते अवैध वृक्ष तोडिस विरोध करण्यास गेले असता ही घटना घडली आहे. या घटनेचा निषेध म्हणून आज चंद्रपुर शहरातील ऐतिहासिक पठाणपुरा गेट समोर इको-प्रो संस्थेच्या सदस्यांनी मूक निदर्शने केली.
राजस्थान मधील पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे श्री विष्णु लांबा आपल्या जीवनकाळात 8 लाख पेक्षा अधिक वृक्ष लावलेली आहेत. ते अध्यक्ष असलेल्या कल्पतरु संस्थेच्या माध्यमाने सुद्धा मागील 20 वर्ष पासून पर्यावरण संरक्षण क्षेत्रात भरीव कार्य करीत आहेत. त्यांचेवर झालेला हल्ला हा एक व्यक्ति एक संस्थेवरचा हल्ला नसून पर्यावरण संरक्षण चळवळीवर झालेला हल्ला आहे, पर्यावरण संरक्षण साठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तिवर हल्ला असल्याचे मत इको-प्रो चे बंडू धोतरे यांनी व्यक्त केले आहे. या घटनेतील दोषी आरोपीवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी राजस्थान चे मुख्यमंत्री यांचेकडे करण्यात आलेली आहे.
‘ट्री मैन ऑफ इंडिया’ श्री विष्णु लांबा यांचेवरील घटनेचा निषेध करीत मूक निदर्शने करण्यात आली यावेळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे नेतृत्वात रवि गुरनुले, धर्मेंद्र लुनावत, अब्दुल जावेद, बिमल शहा, अभय अमृतकर, राजू काहीलकर, राजेश व्यास, कपिल चौधरी, प्रमोद मलिक, जयेश बैनलवार, सचिन धोतरे, सुमित कोहले, अमोल उत्तलवार, सचिन भांदककर आदि सदस्य सहभागी झाले होते.