वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमातुन पर्यावरण रक्षणासाठी लढण्याची प्रेरणा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 इको-प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील अदानी गो बॅक आंदोलनाचे प्रतिक वृक्षांना राखी बांधुन जंगलाच्या संरक्षणासाठी केलेल्या आंदोलनास उजाळा

चंद्रपूर : इको-प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील वृक्षांना राखी बांधुन, युवकांनी वन-वन्यजीव तसेच पर्यावरणाच्या संरक्षणसाठी सदैव तत्पर राहावे, पर्यावरण संरक्षणाकरिता कटिबध्द राहावे असा संदेश कार्यक्रमातुन मान्यवरांनी दिला.

आज लोहारा-मामला वनक्षेत्रातील अदानी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक वृक्षांना राखी बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही एकत्रीत येत आयोजन करण्यात आले. मात्र यावर्षी कोराना आपदामुळे कमी संख्येत छोटया स्वरूपात आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, किशोर जामदार, प्रा. डाॅ. योगेश दुधपचारे, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे, मुकेश भांदककर, प्रा. डाॅ. बारसागडे, प्रा. डाॅ. कायरकर, प्रा. डाॅ. मेश्राम, वनपाल, वनपाल पी. एम. झाडे, वनपाल उत्तम गाठले, राममिलन सोनकर, देवनाथ गंडाटे इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, अब्दुल जावेद तसेच इको-प्रो चे सदस्य, एफईएस महाविदयालयाच्या विदयार्थीनी व वनकर्मचारी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हा असुन ‘वाघांचा जिल्हा’ ही नवी ओळख निर्माण झालेली आहे. या जिल्हयात वन-वन्यजिव या नैसर्गिक संपेदसह मोठया प्रमाणात खनिज संपत्ती सुध्दा आहे. याच खनिजामुळे या जिल्हयात औदयोगिक विकास सुध्दा झालेला आहे. या जंगलाच्या जमिनीखाली असलेल्या कोळशामुळे येथे मोठया प्रमाणात कोळसा खान प्रकल्प, कोळसा आधारित विदयुत प्रकल्प निर्माण करण्यात आले आहे. जंगलाखाली असलेल्या कोळसामुळे येथील वन्यजीव समृध्द जंगलावर कोळसा खान प्रकल्पाचे संकट नेहमीच उभे राहते. आणी प्रश्न उभा राहतो तो येथील पर्यावरणाचा, वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा अधिवासाचा, त्यांच्या भ्रमणमार्गाचा म्हणुन येथील वन-वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी चंद्रपूरकर नागरीकांना सदैव तत्पर राहीले पाहीजे.

इको-प्रो सह अनेक पर्यावरणवादी संस्था-संघटनाच्या तसेच चंद्रपूरकरांच्या जनआंदोलनामुळे प्रस्तावीत अदानी कोळसा खानीचा प्रस्ताव नाकारला गेला होता. या आंदोलनाच्या स्मृती जपत, आपला नैसर्गीक वारसा पुढील पिढीला सुस्थितीत हस्तांतरण करता यावे, याची जाणीवजागृती सर्व घटकामध्ये यावी याकरिता दरवर्षी ‘इतिहासात डोकावुन, भविष्यातील पर्यावरणाची सुरक्षीतता करीता लढण्यास बळ मिळावे’ हा उद्देश लक्षात घेउन इको-प्रो संस्थेच्या वतीने मागील 13 वर्ष पासुन लोहारा-मामला जंगलातील ‘अदाणी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षास राखी बांधुन चंद्रपूर शहरात वन-वन्यजीव व पर्यावरण रक्षणासाठी 2009 साली प्रस्तावीत अदाणी कोळसा खाणीच्या विरोधात झालेल्या जन-आंदोलनाच्या स्मृतीना उजाळा दिला जातो. नव्या पिढीला हा निसर्गसंरक्षणाचा चंद्रपूर जिल्हयातील लढा कायमच स्मरणात राहावा म्हणुन या उपक्रमाचे आयोजन केले जाते.

Lया कार्यक्रमा दरम्यान लोहारा-मामला रोडवरील वनक्षेत्रातील ‘अदाणी गो बॅक’ आदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षास राखी बांधण्यात आली. यावेळी उपस्थितांना सदर उपक्रमाच्या आयोजनामागील भुमीका व आवश्यकता विषयी माहीती देण्यात आली. निसर्गाचे रक्षण करण्यास वनविभागासोबतच सामान्य नागरीक व गावकरी यांचे सुध्दा सहकार्य अपेक्षीत असुन आपल्या अवतीभवतीचे पर्यावरण व जैवविवीधतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहीजे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करीत स्मृतीना उजाळा दिला. यावेळी वनकर्मचारी एम ए धुर्वे, पर्वतकर, इको-प्रोचे राजु काहीलकर, जयेश बैनलवार, सुनिल पाटील, मनिष गांवडे, भारती शिंदे, योजना धोतरे, किनारा खोब्रागडे, पुजा गहुकर, अमोल उटटलवार, हरीश मेश्राम, नरेंद्र बन्सोड, विशाल रामेडवार सहभागी झाले.