घुग्घुस : संपूर्ण जिल्ह्यात मिनी इंडिया म्हणून नावारूपाला आलेल्या घुग्घुस शहरात सर्व जाती – धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात या शहरात मुस्लिम व ख्रिश्चन बांधवाची संख्या ही मोठी असून धार्मिक विधिनुसार त्यांच्या अंतविधी करिता जुन्या कब्रस्थानात जागा अपुरी पडत आहे.
येणाऱ्या काळात तर अंतविधी साठी जागा ही उपलब्ध राहणार नाही ही समस्या तातळीने दूर व्हावी या करिता जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घुस काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी यांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार यांना दिले असून पालकमंत्री यांनी नगरपरिषदेच्या मुख्यधिकऱ्याना जागेचे अहवाल देण्याचे सुचविले.