पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी आर्थिक संकटात

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

दोन महिन्यांपासून वेतन रखडले, दिवाळी जाणार अंधारात

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारात जाण्याची चिन्हे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या विभागातील कर्मचाऱ्यांचे पगारच झाले नाही. मागीलवर्षीही अशीच परिस्थिती या विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आोढावली होती. दिवाळी झाल्यानंतर पगार आणि अग्रीम या कर्मचाऱ्यांना मिळाले होते. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे तातडीने वेतन अदा करावे, अशी या विभागातील कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभाग हा एक महत्त्वाचा विभाग आहे. गावखेड्यातील जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा विभाग आहे. या विभागाअंतर्गत पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी, परिचर, ड्रेसर यासह अन्य कर्मचारी कार्यरत आहे. जवळपास साडेतीनशे ते चारशे कर्मचारी या विभागात कार्यरत आहे. जिल्ह्यातील अनेक पशु वैद्यकीय रुग्णालयांची फारशी चांगली अवस्था नाही. पावसाळ्यात गळते आणि उन्हाळ्यात तापते अशी स्थिती अनेक रुग्णालयांची आहे. अनेक ठिकाणी उपचारासाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना बसण्याची जागा आहे. काही ठिकाणी साध्या खुर्ची नाही. अशा विपरित परिस्थितीत या विभागातील कर्मचारी काम करतात. गेल्या आगस्ट महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. वेतनाबाबत विभागाला विचारणा केली असता ट्रेझरीचे नाव समोर केले जाते. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

मात्र, अजूनही या विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची भीती या कर्मचाऱ्यांना आहे. मागीलवर्षीही दिवाळीत या कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नव्हते. दिवाळीच्या दिवसांत मिळणारा अग्रीमपासूनही कर्मचाऱ्यांना मागीलवर्षी वंचित राहावे लागले होते. ट्रेझरीत बिल पाठविले आहे. सोमवारपर्यंत कर्मचाऱ्यांचे