• जिवीत हाणी नाही, वाहनातील कुटूंबही सुखरूप
चंद्रपूर : गोंडपिपरी : चालकाचे भरधाव जात असलेल्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी फिल्मीस्टाईलने घरात घुसलयाची थरारक घटना आज शुक्रवारी (दि.26) ला दुपारी सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा बसस्थानकानजीक घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची चर्चा सर्वत्र असून आणि आणि अपघातातील फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असल्याचे दिसून येत आहे.
गोंडपीपरी-तालुक्यातील विठ्ठलवाडा मार्गावर वाहन क्र.यू.पी. 93 बिडी 7402 ही चारचाकी गोंडपिपरी मार्गे गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने आष्टीकडे जात होती. अश्यातच भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. अन् चारचाकी वाहन रस्त्यानजिक फिल्मीस्टाईलने एका घरात घूसले. ही घटना विठ्ठलवाडा गावाजवळ घडली.
गावच्या बसस्थानकाजवळ सिंधुबाई सरवर यांचे विटा- कवलुचे कच्चे घर आहे. अश्यातच हे वाहन इतके भरधाव वेगात होते की,रोडच्या कडेला उतरून थेट घराच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीला भगदाड पाडून वाहन घरात घूसले. त्यात सरवर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र यात जिवीतहाणी झालेली नाही. तसेच वाहनात बसलेले कुटुंबही सुखरूप बचावले. या घटनेने हाळ आला होता परंतु वेळ आली होती असाच प्रत्यय येत आहे. एखाद्या सिनेमता वाहनांची ॲक्शन पहायला मिळावी अशीच अवस्था घरात घुसलेल्या वाहनाची दिसून येत असल्याचे सोशलमिडीयावर हे फोटो मोठ्या प्रमाणात वायरल करीत असल्याचे दिसूनेयत आहे. सदर घटनेची माहिती गोंडपिपरी पोलीस स्टेशनला मिळताच त्यांनी घटनास्थळी येवून परिस्थीत हाताळली आहे.