घुग्घूस WCL इंदिरा नगरात सात घरफोड्या ; एकास पकडले, तीन पळाले

0
1149

घुग्घूस(चंद्रपूर): येथील वेकोलिच्या इंदिरा नगरात आज शनिवारी २७ फेब्रुवारी ला एकाच दिवशी सात घरफोड्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. चोरीकरून पळणा-यां चार पैकी एकास पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील एका सराफा दुकान आणि साई नगरात चोरीची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज शनिवारी सात चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

इंदिरा नगरच्या सात घरांमध्ये चोरी करून पळताना चार पैकी एकास नागरिकांनी पकडून घुग्घुस पोलिसांच्या स्वाधीन केले.
वृत्त लिहीपर्यंत अज्ञात आरोपींचा तपास पोलिस घेत आहेत.