• दारू विक्रेत्याविरोधात एल्गार
• अवैध दारू विक्री बंद करा ; संतप्त महिलाची मागणी
चंद्रपूर : घुग्घूस लगतच्या पांढरकवढा येथे अवैध दारू व्यवसाय जोमात सुरु असून याचा नाहक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी अवैद्य दारूविक्री करणा-या व्यावसायीकांचा दारूसाठा पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पांढरकवडा येथील दारू विक्री तातडीने बंद करावी अशी मागणी पोलिसांना निवदेन द्वारे केली आहे. आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास महिलांनी ही कार्यवाही केली.
चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून अरविंद साळवे यांनी रुजू होताच जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर आळा बसविण्याकरिता सहा चमू तयार करून चंद्रपूर जिल्ह्यातील अवैद्य दारू विक्री रोखण्याबाबत आदेश दिले होते. परंतु पोलिस प्रशासनाने पोलिस अधिक्षकांचे आदेश धाब्यावर बसवून अवैद्य दारूविक्रीला पाठबळ दिल्याचे चित्र संपूर्ण जिल्याखणत पहायला मिळत असताना घुग्घूस जवळील पांढरकवडा येथील महिला दारू विक्री विरोधात संतप्त झाल्या आहेत. आज शुक्रवारी स्थानिक महिलांनी गावात दारूविक्री करणा-या व्यावसायीकांची दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अनेक दिवसांपासून गावात विक्री सुरू आहे.
त्यामुळे महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बालके दारूच्या आहारी जात आहे. त्यामुळे याबाबत वारंवार पोलिस प्रशासनाकडे मागणी दारूविक्री बंद करण्याबाबत मागणी करण्यात आली. परंतु त्याकडे पोलिस प्रशासनाचे दूर्लक्ष होत असल्याने अखेर पांढरकवडा येथील महिलांनीच कायदा हातात घेवून गावातील दारू पकडून पोलिसाच्यास स्वाधीन केली.
गावातील संतप्त महिला व ग्रामपंचायतच्या महीला सदस्यांनी दारू विक्री करणाऱ्या दारू दुकानावर धाड टाकून तीस हजाराचा दारू साठा पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यानंतर गावात अवैद्य दारूविक्री होता कामा नये असा इशारा देत पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांना पांढरकवढा निवेदन दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या अर्चना गावंडे, नीला बरडे, बेबीनंदा निखाडे, समीर भिवापूरे, सुरेश तोतडे तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.