अवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

न्युज पोस्टच्या वृत्तानंतर रेस्टारंटमध्ये धाड

चंद्रपूर : वरोरा येथील जेबी सावजी रेस्टारंटमध्ये सुरु असलेल्या अवैध बिअर बारचा वायरल व्हिडीओसंदर्भात न्युज पोस्टने बातमी प्रकाशित केल्यानंतर खळबळून जागे झालेल्या वरोरा पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांना कारवाईत १५ बिअर, १० विदेशी दारू आणि १२ देशी दारू बॉटल सापडतात. याचा अर्थ पोलिसांपेक्षा अवैध दारू विक्रेते सव्वाशेर आहेत. कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसाना इतक्या कमी माल हातात घेऊन यावे लागले. या मागे वसुलीचे “वाझे” तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळी वृत्त प्रकाशित झाल्यानांतर त्याच दिवशी गुरुवारी रात्री ९ वाजता छापा टाकळण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक बेलसरे यांनी आपल्या पथकासह केलेल्या कारवाईत १५ बिअर, १० विदेशी दारू आणि १२ देशी दारू बॉटल जप्त केल्या. याप्रकरणी जेबी सावजी रेस्टारंटचा संचालक अमोल पाटिल यास पोलिसांनी अटक केली. प्राप्त माहितीनुसार जेबी सावजी रेस्टारंट मध्ये देशी-विदेशी दारू मोठ्या प्रमाणांत विकली जाते. त्यासाठी वर्धा जिल्ह्यातील आंबटकर आणि धानोरकर नामक व्यक्ती पुरवठा करण्यात माहीर आहेत. जेबी सावजी रेस्टारंट मध्ये दररोज शंभरावर ग्राहक येतात. त्यांच्या टेबलवर दारू, सोडा, पाण्याची बॉटल आणि चकाना दिला जातो. अनेक मद्यपी टूल होईपर्यंत पितात. दररोज १०० वर रिकाम्या बॉटल जमा होतात. असे असतानां पोलिसांना कारवाईत १५ बिअर, १० विदेशी दारू आणि १२ देशी दारू बॉटल सापडतात. याचा अर्थ पोलिसांपेक्षा अवैध दारू विक्रेते सव्वाशेर आहेत. कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसाना इतक्या कमी माल हातात घेऊन यावे लागले. या मागे वसुलीचे “वाझे” तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सर्वमद्यसेवा जोरात
बिअर बार सारखे वातावरण असलेले अवैध दारूचे हे एकच उदाहरण नाहीतर अनेक शहरात हा प्रकार सुरु आहे. सिंदेवाहीत जयस्वाल नामक विक्रेत्याने आपल्या घरीच मद्यपीसाठी मस्त व्यवस्था करून दिली आहे. ग्राहक देवो भव असल्याने इथे सर्वमद्यसेवा जोरात सुरु आहे.