आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जिल्हाभर काळी फीत लावून आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या वक्तव्याचा निषेध

वर्धा : आरोग्य कर्मचारी संघटना कृती समिती च्यावतिने १६ एप्रिल रोजी मा.जिल्हाधिकारी यांना भेटून कोरोणा आजारावर आळा घालण्यासाठी जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या डॉक्टर आरोग्य कर्मचारी, आशा अंगणवाडी शिक्षक, पोलीस, महसूल कर्मचारी इत्यादी फंन्ट लाईन वर्कर यांना व परिवारातील सदस्यास कोरोणाची लागन झाल्यास प्राधान्याने आँक्सिजन खाट उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी करण्यात आली जिल्हाधिकारी महोदयानी परिस्थिती लक्षात न घेता सरळ शब्दात कर्मचाऱ्यांनी काम करु नये असे वक्तव्य केले. मनुष्यबळ कमी असताना पहिल्या टप्प्यात उत्तम काम करणाऱ्या फंन्ट लाईन वर्करचा एक प्रकारे अपमानच केला. जिल्हाधिकारी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून संपूर्ण वर्धा जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी २६ व २७ एप्रिल रोजी काळी फित लावून निषेध आंदोलन सुरु केले आहे.

२३ एप्रिल २०२१ रोजी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे .जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना आरोग्य कर्मचाऱ्यांचा २६ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या असहकार आंदोलनाची नोटीस राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, सिध्दार्थ तेलतुबंडे, दिपक कांबळे, वंदना उईके, गजानन थुल, अरविद बोटफुले, वैभव तायवाडे, रवी चंन्दे, निलीमा तातेकर, संगिता रेवडे, यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले.

कोरोणा आळा घालण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा नकरता काम करणाऱ्या फंन्टलाईन वर्कर यांना कोरोणाची लागन झाल्यास त्यांच्या व परिवारासाठी आँक्सिजन खाट प्राधान्याने राखीव ठेवा या मुख्य मागणीसाठी कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर आळा घालण्यासाठी राञ न दिवस काम करणाऱ्या डॉक्टर आरोग्य कर्मचारी संपुर्ण पँरामेडीकल स्टाँप आपल्या जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत.या कर्मचाऱ्यांचा थेट संबंध बाधीत रुग्णाशी येतो. त्यामुळे शेकडो कर्मचारी बाधीत झाले आहे. त्या कुठल्याही प्रकारचे सरंक्षण मिळत नसून रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांत असंतोष पसरलेला आहे.

गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ इत्यादी जिल्ह्यात फंन्ट लाईन वर्कर करीता १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तर फंन्टलाईन वर्कर करीत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु वर्धा जिल्ह्यात ९६ आरोग्य कर्मचारी अधिकारी व फंन्ट लाईन वर्कर कोरोणा बांधीत झाले असून सुध्दा वर्धा जिल्हाधिकारी यांच्या चुकीच्या धोरणामुळे आदेश निघाले नाही त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्विकारावे लागत आहे.

जिल्हा प्रशासनाने तात्काळ याबाबत आरोग्य कर्मचारी संघटना कृती समिती पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करुन योग्य निर्णय घ्यावा अन्यथा २८ एप्रिल पासून कोरोणा लसिकरण .कोरोणा तपासणी तसेच कोरोणा संबधीत सर्व कामे पूर्ण बंद करण्यात येईल. जिल्ह्यात बिकट परिस्थितीत वाढ झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यात कोरोणा बांधीत रुग्णासाठी कोवीड केअर सेंटर सुर करा.

रुग्णसेवेसाठी लोकप्रतिनिधी
यांनी पुढाकार घेवून आपला विकास निधी मधून साहित्य
उपलब्ध करुन जिल्ह्यात शासकीय दवाखाने सोयी उपलब्ध करा. कोवीड १९ वर आळा घालण्यासाठी काम करताना फंन्ट वर्करला कोरोणाची लागन झाल्यास किँवा त्यांच्या पासून परिवारास लागन झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून उपचाराची व्यवस्था करणे गरजेचे आहे .फंन्ट लाईनवर्करला आँक्सीजन खाट उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी जिल्ह्यातील आठही तालुक्यात वैद्यकीय अधिकारी सहित आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. कर्मचाऱ्यांनी केलेली मागणी चुकीची असल्यास मा.जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट करावे. किंवा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची सेवाची कोरोणा नियंत्रणासाठी गरज नसल्याची स्पष्ट करावे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना संम्मानाची वागणूक द्यावी. आरोग्य कर्मचारी माणूस आहे त्यांच्या जगण्याचा हक्क मान्य करा.

विनंती आहे योग्य निर्णय जिल्हाधिकारी महोदय करतील अशी अपेक्षा आरोग्य कर्मचारी संघटना कृती समिती नेते दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले. आरोग्य कर्मचारी संघटना कृती समिती च्यावतिने प्रसिध्द पञकात दिपक कांबळे यांनी कळविले आहे.