ओबीसींच्‍या राजकीय आरक्षणाला धक्‍का लावाल तर खबरदार – आ. सुधीर मुनगंटीवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारने एका मागोमाग एक ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण, मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण तर अनुसूचित जातीचे पदोन्‍नतीतील आरक्षण संपविण्‍याचा घाट घातला आहे. या आधीच्‍या भाजपा-शिवसेना युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व अनुसूचित जातीचे पदोन्‍नतीतील आरक्षणही सुरू होते. परंतु तीनही आरक्षणांबद्दल न्‍यायालयांमध्‍ये व्‍यवस्‍थीत बाजू न मांडल्‍याने ही सर्व आरक्षणे न्‍यायालयांनी रद्द केली. ही या सरकारची संवेदनहीनता आहे व याचा मी तिव्र शब्‍दात निषेध करतो, अशी भावना लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज चंद्रपूरात ओबीसी समाजाच्‍या राजकीय आरक्षणाच्‍या मागणीसाठी आयोजित चक्‍काजाम आंदोलनात बोलताना व्‍यक्‍त केली. भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाच्‍या पाठीशी भक्‍कमपणे उभी आहे अशी ग्‍वाही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. गाव स्‍वावलंबी व्‍हावे व सर्व समाजाचा सारखा विकास व्‍हावा याकरिता ही सर्व आरक्षण प्रणाली लागू झाली होती परंतु शासन या सर्व व्‍यवस्‍था मोडीत काढायला निघाल्‍या आहेत असे दिसते, असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

चंद्रपूर जिल्‍हा भाजपातर्फे आज ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुन्‍हा देण्‍याच्‍या मागणीसाठी पडोली चौकात चक्‍काजाम आंदोलन करण्‍यात आले. याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, कुठल्‍याही समाजाला न्‍याय देण्‍यास हे सरकार असमर्थ आहे अशी कृती सरकार स्‍थापन झाल्‍यापासून यांनी केली आहे. याकरता न्‍यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्‍याची मागणी भाजपाने केली आहे. आणखी एक महत्‍वाची घोषणा करताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले की १९ जुलैला महाराष्‍ट्रातील जिल्‍हा परिषदांमध्‍ये अतिरिक्‍त ठरलेल्‍या ओबीसी जागांसाठी होणा-या पोटनिवडणूकांमध्‍ये भाजपा महाराष्‍ट्र सर्व जागी ओबीसी उमेदवारच उभे करेल व या दृष्‍टीने ओबीसी समाजाला न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न करेल.

याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी ओबीसी समाजाच्‍या राजकीय आरक्षणाविषयी विस्‍तृत माहिती दिली. या आरक्षणाने सामाजिक समतोल कसा राखला जाईल या विषयी सुध्‍दा त्‍यांनी आपले मत व्‍यक्‍त केले. याप्रसंगी भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सुध्‍दा यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन नामदेव डाहूले यांनी केले. याप्रसंगी माळी समाजाचे नेते बबनराव वानखेडे प्रामुख्‍याने मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाला महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, महानगर महासचिव राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, रवि गुरनुले, ओबीसी मोर्चा महानगर अध्‍यक्ष विनोद शेरकी, महिला मोर्चा अध्‍यक्षा अंजली घोटेकर, ओबीसी महिला मोर्चा अध्‍यक्षा वंदना संतोषवार, महिला मोर्चा महामंत्री प्रज्ञा गंधेवार, उपाध्‍यक्षा प्रभा गुडधे, युवा मोर्चा अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, तुषार सोम, नगरसेवक संजय कंचर्लावार, प्रदिप किरमे, देवानंद वाढई, प्रशांत चौधरी, राहूल घोटेकर, नगरसेविका छबू वैरागडे, सविता उराडे, शिला चव्‍हाण, वनिता डुकरे, शितल गुरनुले, सविता कांबळे, सुरज पेदुलवार, प्रज्‍वलंत कडू, प्रमोद क्षिरसागर, सुनिल डोंगरे, विठ्ठलराव डूकरे, रवि लोणकर, घुग्‍गुस भाजपाध्‍यक्ष विवेक बोढे, हेमंत उरकुडे, निता चौधरी, अनिल डोंगरे, सुर्यकांत कुचनवार, डॉ. गिरीधर येडे, मनोरंजन रॉय, किरण बुटले, विजय आगरे, अजय चार्लेकर, शोभा पिदुरकर, दुर्गा बावणे, आशिष वाढई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी जोरदार घोषणा देत महाआघाडी सरकारचा निषेध केला.