सामाजिक न्याय दिनी घुग्घुस काँग्रेस तर्फे केंद्र शासनाचा निषेध

घुग्घुस : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर, ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळे यांच्या सूचनेनुसार ओबीसीचे आरक्षण संपवणाऱ्या मोदी सरकारचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला राजश्री शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आले.

सदर आंदोलन काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी भाजप शासनावर कडाडून हल्ला चढविला पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा चमकवण्या साठी सतत मीडियाच्या माध्यमातून हेडलाईन सेट केल्या जात असून देशात मागील सात वर्षात देशाला रसातळाला नेले आहे.
अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी यांनी केंद्र शासनाचा खरपूस समाचार घेतला गेल्या सात वर्षात मोदी विरोध करणाऱ्या नागरिकांना देशद्रोही ठरविण्यात येत असून संविधान व लोकशाहीची निरंतर पायमल्ली करण्याचा पातक केंद्र सरकार करीत आहे.
कामगार नेते सैय्यद अनवर यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील नागरिकांचे दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाला ओबीसीची आकडेवारी मागितली मात्र केंद्र शासनाने आकडेवारी दिली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले.
फडणवीस मुख्यमंत्री असतांना केंद्रीय सामाजिक न्यायमूर्ती  थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसीचा इम्पीरीयल डेटा देण्याची मागणी केली होती केंद्रांना डेटा दिला नाही.

यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले
ओबीसी आरक्षण संपवणाऱ्या मोदी शासनाचा काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात आला याप्रसंगी किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, प्रफुल हिकरे, शेखर तंगलापल्ली, सिनू गुडला, विजय माटला, शहजाद शेख, नुरूल सिद्दिकी, विशाल मादर, बालकिशन कुळसंगे,रोशन दंतलवार, सचिन कोंडावार,संपत कोंकटी, अंकेश मडावी, सूचित सोदारी, राजू कांबळे, बबलू मुंढे,रंजित राखूडे,वतन अटेला, बासमपल्ली पोचम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.