घुग्घुस : येथील माजी पंचायत समिती सदस्या तसेच काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या सौ. रंजिता पवनकुमार आगदारी यांच्या वाढदिवसा निमित्त घुग्घुस नगरपरिषद क्षेत्रातील आराध्य दैवत बैरामबाबा देवस्थान उद्यान , हिंदू स्मशान भूमी,बौद्ध स्मशान भूमी, मुस्लिम कब्रस्थान, सि.एन.आय चर्च याठिकाणी आंबा,फणस, सीताफळ, निंबु, व अन्य फळांचे उपयुक्त असे रोपटे सौ. रंजिता आगदारी यांच्या हस्ते लावण्यात आले.
याप्रसंगी किसान काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, एस्सी सेल अध्यक्ष सुरज बहुराशी,प्रफुल हिकरे, लखन हिकरे, प्रेमानंद जोगी,जावेद कुरेशी, योगेश ठाकरे, नुरुल सिद्दिकी, रोशन दंतलवार, वैभव क्षीरसागर,प्रशांत सारोकार,राजकुमार मूडे,सुधाकर जुनारकर,प्रीतम अट्टेला,इरफान शेख,रिकी सोदारी,राजू निखाडे,शमशिर शेख,शुभम कुम्मरवार,अक्षय कोल्हे,कुणाल दांडगे, वतन अट्टेला, कुमार रुद्रारप, बबलू मुंढे, योगेश दुर्गे,नबी शेख,दीपक दुर्गे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.