जडवाहतुकी विरोधात उसगाव वासीयांचा एल्गार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

दोन तास वाहतूक अडविली; ” गुप्ताचे वाहन चालते मात्र चड्डाला विरोध

घुग्घुस : रविवारी सकाळी 11 वाजता दरम्यान संतप्त उसगाव वासियांनी गावाजवळून जाणारी कोळश्याची जडवाहतूक रोखून धरली. त्यामुळे जड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही दिवसापासून वेकोलीच्या पैनगंगा व मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा भरून जडवाहने उसगावच्या रस्त्यावरून घुग्घुस मार्गे विमला सायंडींग येथे कोळसा खाली करण्यासाठी जात आहे. जड वाहनांची वाहतूक सुरु झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे तसेच उसगाव येथील नागरिक कामा निमित्त घुग्घुस कडे ये-जा करतात तसेच उसगाव जवळील कॉन्व्हेंट व शाळा सुरु होणार आहे त्यामुळे शालेय मुलांचा ही अपघात होऊ शकतो.

त्यामुळे उसगाव जवळून जाणारी जडवाहतूक बंद करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. घुग्घुस पोलिसांनी घटना स्थळी दाखल होऊन आंदोलन करणाऱ्या उसगाव वासियांशी चर्चा केली व ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या प्रबंधकास बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान उपविभाग पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तास कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक रोखून धरण्यात आली शेवटी पोलिसांनी उसगाव ते एसीसी कंपनी कडे जाणाऱ्या रस्त्यावर ब्यारेकेट लावून हा रस्ता बंद केला.
आंदोलनात उसगावच्या सरपंच निविता ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुटकर, सदस्य व गाव वासीय सहभागी झाले होते आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथकास बोलाविण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्रान्सपोर्ट धारकाने पर्यायी रस्ता उपलब्ध होण्यापर्यंत दहा दिवस रस्ता वापराची मुदत मांगीतली आहे.

विशेष म्हणजे कोळसा वाहतुकी पासून एक किलोमीटर वरच उसगाव असून याच ठिकाणाहून गुप्तां कोलवॉशरीज जडवाहन चालत असतात मात्र त्याला गाववासीयांचे समर्थन आहे…!