भद्रावती येथील कुमारिका डॉक्टरचा विनयभंग

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : भद्रावती शहरातील 26 वर्ष कुमारिका डॉक्टर चा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी घडली. कुमारिकेने आज रविवारी (26 सप्टेंबर 2021) ला केलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रमोद कांबळी (वय 35) रा. भद्रावती असे आरोपीचे नाव आहे.

26 वर्षीय कुमारिका डॉक्टर ही नंदुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. ड्युटी झाल्यानंतर ती भद्रावती कडे परत येत असताना तिची दुचाकीत बिघाड आल्याने ती वाटेत थांबली होती. मागाहून येणाऱ्या प्रमोद कांबळीने तिचे जवळ येऊन अश्लील हातवारे केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक कोल्हे करीत आहे.