महागाईची साडेसाती म्हणजे भाजप : खासदार बाळू धानोरकर यांची टीका

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

गोंडपिपरी येथे कार्यकर्ता मेळाव्यात युवकांचा काँग्रेसप्रवेश

चंद्रपूर : या सात वर्षात देशातील शेतकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, महिला वर्गासह सर्वच घटक असमाधानी असल्याचे दिसत आहे. मागील काही महिन्यापासून देशात सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. बहुतेक शहरामध्ये पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. गॅसचे वाढते भाव माय बहिणीच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत. देशातील नागरिकांना आता केंद्र शासन चालविणाऱ्या गुजरातच्या जोडीची वास्तवता लक्षात आली आहे. मोदी सरकारचे हे साडेसात वर्ष जणू महागाईची साडेसाती असल्याची खोचक टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली. गोंडपिपरी तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस , युवा काँग्रेस , सेवादल, अनुसूचित दल च्या वतीने स्थानीक कन्यका सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार सुभाष धोटे, जिल्हा मध्यवर्ती बँक चे अध्यक्ष संतोष रावत, राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, रामचंद्र करवडकर, सुरेश चौधरी, तुकाराम झाडे, अशोक रेचनकर, राजू चंदेल, संभुजी येलेकर, देवेंद्र बट्टे, अभिजीत धोटे, रेखाताई रामटेके, देविदास सातपुते, सपना संकलवार, बसंत सिंग, सचिन फुलझेले, रफिक शेख, विनोद नागपुरे, रेखा रामटेके, खेमदेव गरपल्लीवार यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे तुकेश वानोडे, शिवसेनेचे हरमेल डांगीजी यांच्यासह शेकडो युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, आमदार, खासदार, पालकमंत्री, राज्यात सत्ता पूर्ण आपली आहे. त्यामुळे आता सर्वांगीण विकास या क्षेत्राच्या करावयाच्या असेल तर पूर्ण ताकतीने पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद यामध्ये काँग्रेसच्या झेंडा फडकायला हवा त्यासाठी सर्वानी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही. सामान्य नागरिकांना आता काँग्रेसकडून अपेक्षा आहेत. यादृष्टीन गावागावात काँग्रेस विचारधारा पोहचविण्याच काम कार्यकर्त्यांनी कराव अस आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले. राजुरा विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करतांना गोंडपिपरी तालुक्याकडे दुर्लक्ष करणार नसल्याची ग्वाही यावेळी आमदारानी दिली.

जिल्हा मध्यवर्ती बँक चे अध्यक्ष संतोष रावत याप्रसंगी म्हणाले कि, ‘अभी नही तो कभी नाही’ या प्रमाणे सर्वानी आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या झेंडा फडकविण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. प्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.