भद्रावती तालुक्यातील शेगाव व बोरगाव येथील शेतक-याला आर्थीक सहकार्य

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘शेतकरी कल्याण निधी’ या योजने अंतर्गत चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग चंदनसिंग रावत यांचे पुढाकाराने व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांच्या माध्यमातून भद्रावती तालुक्यातील शेगाव (खु.) व बोरगाव (धांडे) येथील शेतक-याला आर्थिक सहकार्य करण्यात आले.

शेगाव (खुर्द) येथील ज्ञानेश्वर श्रावण जांभुळे यांचे वडील श्रावण महादेव जांभुळे यांचा डूकराच्या हल्ल्यात मृत्यु झाला व बोरगाव (धांडे) येथील शेतकरी मधुकर रामचंद्र महाकुलकर या शेतक-याचा बैल साप चावल्याने मृत झाला. त्यामुळे (दि.२६) ला रवि शिंदे यांनी दोन्ही शेतक-याला सानुग्रह धनादेश वितरीत केला.
याप्रसंगी जिल्हा परीषद सदस्य मारोती गायकवाड, सागरा सेवा संस्थाचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर धांडे, सामाजिक कार्यकर्ते पंडीत कुरेकर, सहाय्यक निबंधक बोधे आदी उपस्थित होते.