भाजपा जिल्हाध्यक्ष बर्थ डे सेलिब्रेशन मध्ये दुसरा पदाधिकारी कोरोना संक्रमित 

0
439
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाचा वाढदिवसाचा राजकीय इव्हेंट अत्यंत थाटात झाला पाहिजे याकरीता कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले घुग्घुस शहरातील प्रत्येक वॉर्डात जाऊन घरोघरी भेटी दिल्या

शहरातील सर्वच प्रमुख चौकात मोठं – मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले ऑटो रिक्षाने गल्लोगल्ली वाढदिवसा निमित्य घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे प्रसिध्दी करण्यात आली.
21 नोव्हेंबर रोजी गांधी चौकात आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला.
21 किलोचा केक कापण्यात आला हे सर्व होत असतांना राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून यापासून सावध होण्यासाठी कुठल्याही प्रकारे सुरक्षित साधनांची अंमलबजावणी करण्यात आली नाही.
घेण्यात आलेल्या कार्यक्रमा निमित्य देण्यात आलेली भेट वस्तू घेन्यासाठी नागरिकांची लांबलचक लाईनच लागली होती.
आता हा वाढदिवस कार्यक्रम कार्यकर्त्यासह गावातील नागरिकांच्या जीवाशी खेळायला लागतो की काय ?
अशी भीती निर्माण होत आहे
21 नोव्हेंबर ला झालेल्या कार्यक्रमा नंतर एक कार्यकर्ता कोरोना संक्रमित झाल्यामुळे त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आता परत युवा पदाधिकारी कोरोना संक्रमित झाला आहे.

हा कार्यक्रम गांधी चौक सारख्या अत्यंत वर्दळीच्या व कमी जागेवर घेण्यात आल्यामुळे सामाजिक अंतर शक्यच नव्हते व आयोजकांनी ही काळजी घेतली नाही या कार्यक्रमात जिल्हास्तरीय नेता स्वतः विना मास्क वावरत असतांना अन्य कुणाकडून काय अपेक्षा ठेवायच्या ?

असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे
आता पर्यंत कोरोनामुळे जास्त प्रभावित न झालेला शहर आता यांच्या निष्काळजी वागण्यामुळे महामारीच्या प्रकोपाला बळी पडतो की काय ?
अशी भीतीदायक परिस्थितीत निर्माण होत आहे.