नेत्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात एक पदाधिकारी कोरोना संक्रमित मिळाला

0
424

घुग्घुस : राजकीय क्षेत्रातील नेत्यांना वाढदिवसाचा मोह आवरत नाही. हे मागील सहा महिन्यात सातत्याने घुग्घुसकर जनतेला पाहायला मिळालेले आहे. ऐन कोरोनाच्या काळात सर्वत्र लॉकडाउन असतांना एका प्राध्यापक असलेल्या नेत्यांचा 26 केक युक्त बर्थ डे पार्टी जिल्ह्यात चर्चेत आली होती.

त्यानंतर परत एका नेत्यांच्या वाढदिवसाला पोलीस पोहचताच कार्यकर्त्यांनी केक सोडून धूम ठोकली होती.
आता देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे
प्रधानमंत्री ते मुख्यमंत्री या महामारी पासून नागरिकांच्या जीवरक्षणा साठी कठोर पावले उचलण्याची तैयारी करीत असतांना 21 नोव्हेंबर रोजी घुग्घुस गांधी चौक येथे एका मोठ्या नेत्याच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळेस कुठल्याही प्रकारे कोरोना पासून बचावाची अंमलबजावणी करण्यात आली नाही.
याकार्यक्रमात 21 किलोचा केक कापून जबरदस्त आतिषबाजी करण्यात आली मात्र याच कार्यक्रमात शामिल प्रमुख पदाधिकारी कोरोना संक्रमित झाल्यामुळे या कार्यक्रमात मोठया संख्येने घुग्घुस येथील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे सामूहिक संक्रमण होतो की काय ? अशी नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.