नागपूर न्यायालयाने दिले आमदार बंटी भांगडिया यांचे विरोधात दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0
778
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

नागपुरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अँड. तरुण चतुरभाई परमार , १८, भूपेश नगर , पोलीस लाइन्स टाकली मागे, नागपूर यांनी पोलीस स्टेशन सक्करदरा, नागपूर आणि पोलीस स्टेशन इमामवाडा येथे चिमुरचे आमदार कीर्तीकुमार मितेश भांगडीया यांचे विरुद्ध नागपूर सुधार प्रन्यासचे वेगवेगळे २ फ्ल्यँट लबाडीने आणि जाणीवपूर्वक बळकाविल्या बाबत तक्रार दिली होती. प्राप्त माहितीप्रमाणे, या तक्रारीवर संबधित पोलीस स्टेशन आणि पोलीस उपायुक्त परी. क्र. ४ यांनी कारवाई न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात वेगवेगळे दोन प्रकरणे त्यांनी दाखल केली होती.

प्रकरण जनप्रतिनिधी याचे विरूद्धचे खटल्याविरुद्ध्चे प्रकरणाकरिता विशेष न्यायालय प्रथम श्रेणी न्यायाधिश कोर्ट क्र. ३ नागपूर श्री देशमुख यांचे न्यायालयात स्थानांतरीत झाले . याचिकाकर्ते श्री परमार यांचे वतीने अँड. वैभव जगताप यांनी कामकाज पहिले. हे प्रकरण अधिक तांत्रिक आणि गुंतागुंतीचे असल्याने वास्तुविशारद आणि न्यायवैधकतज्ञ तसेच गुन्हेशास्त्रातज्ञ अँड. सतीश उके यांनी यात मा. न्यायालयात याचिकाकर्ते यांचे करिता दोन्ही प्रकरणात युक्तिवाद केला आणि बाजू मांडली . मा. न्यायालयाचे केस स्टेटस याप्रमाणे आज दि. २४.१२.२०२० रोजी मा. न्यायालयाने दोन्ही प्रकरणात पूर्ण सुनावनीअंती या याचिका मंजूर केल्या आहेत . याअर्थी संबधित पोलीस स्टेशन यांना आता चिमुरचे आमदार कीर्तीकुमार मितेश भांगडीया याचे विरुद्ध भा. दं. वी. चे कलम १९९, २००, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा नोंदवून तपास करावयाचा आहे !

याचिका प्रमाणे हकीकत अशी आहे कि पत्ता. श्रीमान पँलेस , गाळा क्र. ७०५ , लोकमत चौक धंतोली , नागपूर निवासी चिमुरचे आमदार कीर्तीकुमार मितेश भांगडीया याची पत्नी सौ. सोनल कीर्तीकुमार भांगडीया आहेत . सौ. सोनल यांनी दि. १४.०३.२००७ रोजी नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड , सदर नागपूर येथे नागपूर सुधार प्रन्यास ची लोकगृह निर्माण योजना दहीपुरा उंटखाणा ले आउट या योजनेत सदनिका मिळने करीता आवेदन करून सोबत ५०,०००/- रुपये दि. १४.०३.२००७ रोजी जमा करून 2BHK सदनिका दि. १२.०९.२००७ च्या सोडती प्रमाणे दि. १७.०९.२००७ रोजी प्रतिज्ञापत्र देवून इमारत क्र. AB मधील गाळा क्र. ३०१ ही मिळविली. या दरमियान त्रिपक्षीय करार सौ. सोनल कीर्तीकुमार भांगडीया, नागपूर सुधार प्रन्यास आणि सिंडीकेट बँक याच्यात दि. ४.८.२००७ रोजी करण्यात आला. या सदनिकेचा सौ. सोनल कीर्तीकुमार भांगडीया यांनी कब्जा दि. २४ सप्टेंबर २००७ रोजी मिळविला, तेव्हा पासून हि सदनिका ना. सु. प्र. आणि नागपूर महानगर पालिका याचे रेकॉर्डवर त्यांचे नावे दर्ज आहे व त्या त्याचे सर्व पैसे अदा करित आहेत. हि सदनिकेची योजना शासनाचे लोक आवास योजने अंतर्गत बेघर लोकांना निवारा प्राप्त करून देणाऱ्या योजनेप्रमाणे स्थानिक नियोजन प्राधिकरण यांची सार्वजनिक हितार्थ लोकगृह योजना होती. याप्रमाणे कीर्तीकुमार मितेश भांगडीया आणि त्यांची पत्नी सौ. सोनल कीर्तीकुमार भांगडीया या जोडप्याचे जवळ सदनिकेचा कब्जा दि. २४ सप्टेंबर २००७ पासून आहे आणि तेव्हापासून ती सदनिका सौ. सोनल कीर्तीकुमार भांगडीया यांचे नावे आहे.

कीर्तीकुमार मितेश भांगडीया , पत्ता. लोकमत बिल्डिंग , विंग “बी” ९०५, नागपूर यांनी दि. ५.०४.२००७ रोजी नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड , सदर नागपूर येथे नागपूर सुधार प्रन्यास ची आयुर्वेदिक लेआउट , सक्करदरा येथील संकुलात या योजनेत सदनिका मिळने करीता आवेदन करून सोबत ५०,०००/- रुपये दि. ५.०४.२००७ रोजी जमा करून 3BHK सदनिका दि. २९.०४.२००८ च्या सोडती प्रमाणे दि. १६.०३.२००९ रोजी रु. १००/- चे स्टँम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र यात “ माझे , माझ्या पत्नीचे किंवा माझ्या अज्ञान मुलाच्या नावाने नागपूर महानगर पालिका / नागपूर सुधार प्रन्यासच्या हद्दीत घर, गाळे किंवा भूखंडक नाही.” असे खोटे नमूद करून शपथेवर लिहून देवून इमारत क्र. D मधील गाळा क्र. २०२ ही मिळविली. या सदनिकेचा कब्जा कीर्तीकुमार मितेश भांगडीया यांनी दि. ०९ एप्रिल २००९ रोजी मिळविला, तेव्हा पासून हि सदनिका ना. सु. प्र. यांचे रेकॉर्डवर त्यांचे नावे दर्ज आहे व ते सर्व कर, पैसे अदा करित आहेत. हि सदनिकेची योजना शासनाचे लोक आवास योजने अंतर्गत बेघर लोकांना निवारा प्राप्त करून देणाऱ्या योजनेप्रमाणे स्थानिक नियोजन प्राधिकरण यांची सार्वजनिक हितार्थ लोकगृह योजना होती. याप्रमाणे कीर्तीकुमार मितेश भांगडीया यांचे जवळ सदनिकेचा कब्जा दि. ०९ एप्रिल २००९ पासून आहे आणि तेव्हापासून ती सदनिका कीर्तीकुमार भांगडीया यांचे नावे आहे या सदनिकेत कीर्तीकुमार भांगडीया यांनी फेरबदल करून २ भागात विभागणी केली, त्यात किरायेदार म्हणून अतुल बी. वाळके व एस. बी. मसराम हे राहतात .

कीर्तीकुमार मितेश भांगडीया यांनीं ०७४ –चिमूर विधानसभा मतदार संघ येथून सन २०१९ साली निवडणूक लढवितांना नामांकन पत्रासोबत दिलेले प्रतिज्ञापत्र ( फॉर्म २६, नियम ४ अ) याप्रमाणे यात शपथेवर वरील दोन्ही मालमता अनुक्रमे स्वतः व त्याचे पत्नीच्या नावे असल्याचे नमूद केल्या आहेत.

याप्रमाणे नागपूर शहर स्थानिक नियोजन प्राधिकरण नागपूर सुधार प्रन्यास ची लोकगृह निर्माण योजना दहीपुरा उंटखाणा ले आउट या योजनेत सदनिका इमारत क्र. AB मधील गाळा क्र. ३०१ याचा कब्जा दि. २४ सप्टेंबर २००७ पासून सौ. सोनल कीर्तीकुमार भांगडीया यांचेकडे आहे आणि तेव्हापासून ती सदनिका सौ. सोनल कीर्तीकुमार भांगडीया यांचे नावे आहे. असे असतांनाही त्यानंतर कीर्तीकुमार मितेश भांगडीया यांनी माझे , माझ्या पत्नीचे किंवा माझ्या अज्ञान मुलाच्या नावाने नागपूर महानगर पालिका / नागपूर सुधार प्रन्यासच्या हद्दीत घर, गाळे किंवा भूखंड नाही.” असा खोटा लेख लिहून त्याचा उपयोग करून आणि तसे दि. २३.०६.२००८ रोजी रु. १००/- चे स्टँम्प पेपरवर नोटरी प्रतिज्ञापत्र १००/- रुपयेचे स्टँम्प पेपरवर सादर करून वरील प्रमाणे स्वतःचे नावे नागपूर सुधार प्रन्यास ची आयुर्वेदिक लेआउट , सक्करदरा येथील संकुलात या योजनेत गाळा क्र. AB / ३०३ ही मिळविली. या सदनिकेचा कब्जा दि. २५ जून २००८ रोजी पासून कीर्तीकुमार मितेश भांगडीया यांचेकडे आहे आणि तेव्हापासून ती सदनिका कीर्तीकुमार भांगडीया यांचे नावे आहे. याप्रमाणे पात्र नसतानाही सत्य परिस्थिती लपवून हि सदनिका कीर्तीकुमार मितेश भांगडीया यांनी मिळविली आणि लबाडीने सार्वजनिक फसवणूक केली आणि हि पात्र असलेल्या गरजू नागपुरवासी बेघर याचे हक्काची मालमत्ता गैरमार्गाने बळकावली आहे . करिता कीर्तीकुमार मितेश भांगडीया याचे विरुद्ध भा. दं. वी. चे कलम १९९, २००, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल होवून कारवाई होनेस पोलीस स्टेशन इमामवाडा नागपूर येथे रिपोर्ट दि. २९.१०.२०२० रोजी दिली आहे परंतु पोलीस स्टेशन इमामवाडा यांनी कसलीही कारवाई केली नाही.