चंद्रपूर : भद्रावती शहरालगतच्या चांदा आयुध निर्माणी वसाहत परिसरातील नाल्यात बिबट मृतावस्थेत आढळून आला आहे. ही घटना काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आली असून त्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला पाठविला आहे. सध्यातरी बिबट्याचा मृत्यू मृत्यूचे अस्पष्ट आहे.
भद्रावती शहरालगत चांदा आयुध निर्माणी वसाहत आहे. याच परिसराला लागून नाला आहे. वसाहत परिसरातील नागरिक दैनंदिन या परिसरातफिरायला येतात. काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काही नागरिक फिरायला आले असता, त्यांना नाल्यात मृतावस्थेत बिकट आढळून आल. लगेच या घटनेची माहिती भद्रावतीचे वनपरिक्षेत्राधिकारी यांना देण्यात आली, त्यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.
मृतावस्थेत आढळलेला बिबट चार महिन्याचा असून नर जातीचा आहे.चांदा आयुध निर्माणी वसाहत परिसरात वन विभागाने वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी कॅमेरे लावले असून या माध्यमातून बिबट्याच्या मृत्यूचे कारण शोधले जात आहे.