चिमुकलीवर आत्याचार करणाऱ्या “त्या” नराधमाची केस वकिलांनी घेऊ नये

0
424
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

नारी शक्ती संघटनेची बार असोसिएशनला विनंती

चंद्रपूर : आंध्रप्रदेश मधील दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू झाला, यामध्ये महिला अत्याचारांवर 15 दिवसात चार्जशिट फाईल करून 30 दिवसात खटला संपविण्याची तरतूद आहे.मात्र आजही महिला अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाही आहे.

चंद्रपूर शहरातील सावरकर नगर येथील शासकीय दूध डेअरीजवळ राहणाऱ्या गरीब परिवारातील एका 3 वर्षीय मुलीवर 25 मार्चला शेजारी राहणाऱ्या 35 वर्षीय आरोपी भीमराव गोंगले यांनी अमानुषपणे बलात्कार केला. सदर नराधम आरोपीची केस वकिलांनी घेऊ नये अशी मागणी नारी शक्ती संघटनेने केली आहे. याबाबत त्यांनी बार असोसिएशनला विनंती केली आहे.
अत्याचाराची घटना घडल्यानंतर ती चिमुकली घरी आली व घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या आईला सांगितला, व त्याच दिवशी पीडितेची आई व वडिलांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. शहरातील ह्या अमानुष घटनेतील आरोपी भीमराव गोंगले याची केस कोणत्याही वकिलाने घेऊ नये अशी विनंती नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्षा सुनीता गायकवाड यांनी बार असोसिएशनला केली आहे.

पोलिसांनी सुद्धा घटनेतील पीडितेसोबत नम्रपणे वागण्याचा सल्ला दिला असून घटनेनंतर पीडित व त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे घाबरून असतात, त्यावेळी त्यांना धीर देण्याची गरज असते. चंद्रपूर शहरात घडलेल अत्याचाराचं हे प्रकरण शक्ती कायद्यांतर्गत तातडीने कोर्टात दाखल करून याचा लवकर निकाल लावावा व जिल्ह्यात कुठेही महिलांवर अत्याचार झाल्यास नारी शक्ती संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन नारी शक्तीच्या अध्यक्ष सुनीता गायकवाड, उपाध्यक्ष सायली येरने,पूजा शेरकी,अर्चना आमटे,रूपा परशराम,अल्का मेश्राम,संतोषी चोव्हाण, प्रेमीला बावणे,वर्षा भोमले,प्रतिभा लोनगाडगे, माधुरी निवलकर,जोती रंगारी,सरस्वती गावंडे, शिल्पा कांबळे यांनी केलं आहे.