चंद्रपुरात दिवंगत ‘दीपाली चव्हाण’ आत्महत्या प्रकरणात ‘इको-प्रो महिला मंच’ कडून ‘मूक निदर्शने

0
119
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी, दोषींवर कठोर कार्यवाहीची मागणी

चंद्रपूर : राज्यात गाजत असलेल्या तरुण महिला वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात, आज चंद्रपूर शहरात स्थानिक इको-प्रो संस्थेच्या ‘इको-प्रो महिला मंच’ कडून घटनेचा निषेध करीत ‘मूक निदर्शने’ करण्यात आले. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मेळघाट मधील गुगामल वन्यजीव विभाग अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वनपरिक्षेत्र च्या तरुण महिला, कर्त्याव्यनिष्ठ अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळया झाडून आत्महत्या केलेली आहे. या घटनेत समोर आलेल्या सुसाईड नोट मध्ये स्पष्ट झाले आहे की, वरीष्ठ वनाधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. सोबतच या चिठ्ठी मध्ये वरिष्ठांकडून मिळत असलेल्या अपमानजनक वागणुकीचा पाढाच वाचलेला आहे. सतत होणारा त्रास आणि अन्याय सहन करण्यापलीकडे गेल्याने आपल्या कामाने, कर्तबगारीने लेडी सिंघम म्हणून ओळखली जाणाऱ्या या अधिकारीची सुद्धा हिम्मत हरली.

या सुसाईड नोट आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी उच्चस्तरीय समिती कडून करण्याच्या मागणीकरीता आज शनिवारी मूक निदर्शने आंदोलनातून करण्यात आली. यात इको-प्रो महिला मंच च्या योजना धोतरे, मनीषा जयस्वाल, प्रगती मार्कन्डवार, भारती शिंदे, नीता रामटेके, अंजली अडगूरवार, मोनाली बुरडकर, कोमल राऊत सहभागी झाले होते. तसेच यावेळी इको-प्रो चे पदाधिकारी बंडू धोतरे, नितीन बुरडकर, राजू काहिलकर, अनिल अडगूरवार, आकाश घोडमारे, हेमंत बुरडकर सहभागी झाले होते.