चंद्रपुरात 24 तासात उच्चांकी 1603 कोरोनामुक्त ;  1311 पॉझिटिव्ह तर 17 मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• कोरोनामुक्त रुग्णांची वाढ जिल्हा प्रशासन आणि नागरिकांकरीता दिलासादायक

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात उच्चांकी 1603 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 1311 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 17 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

काल सोमवारी कोरोना मुक्त रुग्णांचा आकडा हा 1300 होत. कालच्या तुलनेत आज मंगळवारी झालेली वाढ उच्चांकी आहे. कोरोनामुक्त रुग्णांची वाढ जिल्हा प्रशासन आणि नागरिकांकरीता दिलासादायक ठरली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 55 हजार 680 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 39 हजार 318 झाली आहे. सध्या 15 हजार 534 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 64 हजार 93 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 29 हजार 59 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक परिसरातील 51 वर्षीय पुरुष, दत्तनगर वार्ड येथील 62 वर्षीय महिला, स्वावलंबी नगर येथील 63 वर्षीय महिला, तुकूम येथील 60 वर्षीय महिला, पंचशील चौक परिसरातील 47 वर्षीय महिला, दादमहल वार्ड येथील 50 वर्षीय पुरुष, भेंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील जिजामाता वार्ड येथील 55 वर्षीय पुरुष, बोर्डा येथील 55 वर्षीय पुरुष, कळमगव्हाण येथील 30 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील पंचशील नगर येथील27, 33 व 66 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष तर वणी-यवतमाळ येथील 85 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 828 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 763, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1311 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 495, चंद्रपूर तालुका 116 बल्लारपूर 44, भद्रावती 36, ब्रम्हपुरी 75, नागभिड 80, सिंदेवाही 72, मूल 46, सावली 20, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 23, राजूरा 40, चिमूर 35, वरोरा 68, कोरपना 122, जिवती 12 व इतर ठिकाणच्या 16 रुग्णांचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दि. 21 एप्रिल ते 25 एप्रिल आणि दि. 28 ते 1 मे या कालावधीत जनता जनता कर्फ्यूची अंमलबजावणी सूरू केली आहे. त्याला शहरी आणि ग्रामीण भागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवाय राज्य शासनाने केलेले कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणीही शुध्दा कडेकोटपणे होत आहे. त्याचाच परिणाम मृत्यू आणि बाधित रुग्णांच्या आकडेवारीथ आलेली घट आहे. शिवाय बरे होणा-या रुग्णांची संख्याही अपेक्षेप्रमाणे वाढली आहे.