जनता कर्फ्यू संपताच बाजारात उसळली गर्दी ; आज घुग्घुस येथे 32 कोरोना बाधीत

घुग्घुस : आठवडी बाजारात पाच दिवसाच्या जनता कर्फ्यु नंतर सोमवारला व मंगळवारला सकाळ 07 ते 11 दरम्यान भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. दिनांक 21 एप्रिल पासून 25 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यु लागू होताच पाच दिवस घुग्घुस येथील किराणा भाजीपाला फळ विक्रीचे दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते.

परंतु पाच दिवसाचा जनता कर्फ्यु संपताच सोमवार 26 एप्रिलला व मंगळवार 27 एप्रिल ला सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला, फळे विक्रेत्यांची दुकाने सुरु होताच नागरिकांनी खरेदी साठी मोठी गर्दी केली.

घुग्घुस आठवडी बाजारातील ओट्यावर भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने सुरु होताच नागरिकांची खरेदी साठी मोठी गर्दी केली त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. घुग्घुस नगरपरिषद कार्यालया समोरच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

आज घुग्घुस नगरपरिषद परिसरात 32 नागरिक कोरोना बाधीत झाले असून आनंदाची बाब म्हणजे घुग्घुस नकोडा परिसरात आज दिवसभर जवळपास 600 जणांनी कोरोना लसीकरण करून घेतलेले आहे.