कोरोनाचा दुसरा डोज घेणाऱयांसाठी नवीन लसीकरण केंद्र सुरू करा – आ. किशोर जोरगेवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : नागरिकांचा संभ्रमदूर करत कोरोना लसीकरणाचा दुसरा डोज घेणाऱयांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वेगळे लसीकरण केंद्र तयार करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. यात ठराविक अंतरानंतर कोरोना लसीचा दुसरा डोज दिल्या जात आहे. मात्र याकरिता वेगळे लसीकरण केंद्र नसल्याने पहिला डोज आणि दुसरा डोज घेणाऱयांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तसेच सदर लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांची गैरसोयही होत आहे.

यात अनेक नागरिकांना कोरोनाच्या दुसऱ्या डोज पासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. ही बाब लक्षात घेता कोरोनाचा दुसरा डोज घेणाऱयांसाठी वेगळे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.