मुंबई : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लागू असलेला लाॅकडाऊन 1 जूननंतर उठवला जाईल की पुन्हा वाढवला जाईल यावर सर्व स्तरांत चर्चा सुरु असताना यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लाॅकडाऊन वाढवण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.
आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट लाॅकडाऊन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली.
लाॅकडाऊन वाढणार असला तरी सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला असल्याचे टोपे यांनी सांगितलं. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.