शिवनेरी मैदानावर स्वातंत्रवीर विनायक सावरकर व्यायामशाळेचे लोकार्पण सोहळ्यात गोंधळ

इंटक युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांचा कार्यकर्त्यांसह धुडगूस

चंद्रपूर : मनपातील तुकूम प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2018-19 या वर्षातील MP Hansraj Ahir यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेले शिवनेरी मैदानावर स्वातंत्रवीर विनायक सावरकर व्यायामशाळेचे आज लोकार्पण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर Former Union Minister of State for Home Hansraj Ahir यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या लोकार्पण कार्यक्रमात इंटक युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती District President of INTUC Youth Congress Prashant Bharti यांनी कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी गोंधळ घातला.

काही वेळात हा गोंधळ शांत झाला पण 26 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सावरकर व्यायामशाळेच्या नावाला कांग्रेस ने विरोध केला असला तरी तो विरोध नेमका काय? यामध्ये गोंधळ उडाला प्रशांत भारती यांनी शिवनेरी मैदानाचे वाद नामकरण कशाला हा प्रश्न विचारला, मात्र शिवनेरी मैदानात व्यायामशाळा सावरकर यांच्या नावाने जरी असली तरी मैदानाचे नाव शिवनेरी असणार आहे.

सदर गोंधळाने लोकार्पण कार्यक्रमात नवा गोंधळ उडाला, लोकार्पण कसले व विरोध कुणाला हे कदाचित इंटक युवक कांग्रेस जिल्हाध्यक्षाला कळले नसणार.