शहरातील मिठाई व खाद्य पदार्थांच्या दुकानांची नियमीत पाहणी करावी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• भद्रावतीत भेसळ मिठाईची विक्री?

• मिठाई व खाद्य पदार्थांच्या स्वच्छता व सुरक्षिततेचा प्रश्न
• एकाच तेलाचा खाद्यपदार्थांसाठी पुनर्वापर

भद्रावती (चंद्रपूर) : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. शहरात मिठाई विक्रीचे व्यवसाय वाढले आहेत. ग्राहक मोठ्या प्रमाणात मीठाई खरेदीसाठी गर्दी करीत आहे, मात्र भेसळयुक्त मिठाईचा पुरवठा होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक मिठाई आणि खाद्य पदार्थांच्या पॅकेजींग बॉक्सवर निर्मितीची तारिख तसेच वापराचा अवधी छापणे बंधनकारक आहे मात्र तसे आढळून येत नाही. एकदा कढईत खाद्यपदार्थ तळण्याकरीता तेल घातले की त्याच तेलाचा वापर वारंवार केल्या जात आहे. शहरातील चौकाचौकात फास्ट फुड, जंक फुड, बिर्याणी व फ्राय मांस ची स्टाल लागलेली आहेत. त्यांच्यासह हॉटेल, रेस्टारंट, फेरीवाले यांच्याकडे खाद्यपदार्थ बनवितांना मोठ्या प्रमाणात तेलाचा पुनर्वापर केल्या जात आहे.
अन्न प्रशासन विभागाकडुन नियमित तपासणी होत नसल्याने नव्या नियमांची काटेकोर तपासणी होत नसल्याची बाब समोर आली आहे.

एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल वारंवार वापरल्याने आरोग्यासाठी हानिकारक असल्याने 1 मार्चपासून शासनाने जळालेल्या तेलाचा वापरावर निर्बंध आणले आहे. भारतीय फुड सेफ्टी स्टॅंडर्ड ॲथॉरीटीच्या सुचनेवरुन सादर निर्बंध लागु करण्यात आले आहे.
सोबतच कोरोणा विषाणुच्या प्रादुर्भावाचा काळ सुरु असल्याने मिठाई व खाद्य पदार्थ बनविण्याची जागा (कीचन) तथा साधने स्वच्छ व सुरक्षित असल्याचे पाहणे गरजेचे आहे. याकडे तहसिल कार्यालयातील अन्न निरिक्षक (फुड इन्स्पेक्टर) यांनी स्वत: नियमीत पाहणी करुन लक्ष देण्याची मागणी केल्या जात आहे.

टाळेबंदीतील नियम शिथील करुन प्रशासनाने खाद्य पदार्थ विक्रीवरील निर्बंध दुर करुन व्यवसाय आधीप्रमाणे सुरु ठेवण्यास परवानगी दिली. मात्र कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव अद्याप सुरु असल्याने मिठाई व खाद्य पदार्थ बनविण्याच्या ठीकाणांची पाहणी अन्न निरीक्षकांनी वारंवार करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरीकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवल्या जावू शकतात. मिठाई बनविणारे बरेच कारागिर हे बाहेर राज्यातून आलेले असतात, त्यांचे कोविड टीकाकरण झाले आहे का याची तपासणी होणे देखील गरजेचे आहे. मिठाई बनवितांना भेसळयुक्त मैदा, रवा, तेल, साखर आदी पदार्थांचा वापर होत असल्याची माहिती आहे. मिठाई व खाद्य पदार्थ ग्राहकांना देतांना हातात ग्लोव्ह्ज घातल्या जात नाही. कीचन स्वच्छ ठेवल्या जात नाही. खाद्य पदार्थ फुटपाथवर उघडे ठेवल्या जात आहे.

ग्राहक व खाद्यपदार्थामधे अंतर ठेवले जात नाही. खोकला व शिंक यापासून पसरणा-या विषाणुपासून बचावासाठी खाद्य पदार्थ सुरक्षित ठेवले जात नाही, हे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे प्रशासनाने स्थानिक डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, आरोग्यसेवक यांना घेवुन एक चमू तयार करुन दररोज मिठाई व खाद्य पदार्थ कीचन व दुकानांची पाहणी करावी, अशी मागणी ग्राहक करीत आहेत.


ग्राहकांनी यावर्षी घरीच बनविलेली मिठाई खावी अथवा बाजारात मिळणारी मिठाई चाचपुणच घेणे, आरोग्यासाठी फायद्याचे होणार आहे, असेही तज्ज्ञांचे मत आहे.