सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधी काम केले नंतर निविदा काढल्या

एका विशिष्ट कंत्राटदाराला लाभ पोहोचविण्याचा हेतू

चंद्रपूर : शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना उरफाटे फिरविण्याची किमया येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. आधी काम पूर्ण केले. त्यानंतर निविदा काढण्याचा पायंडा अधिकाऱ्यांनी पाडला. बांधकाम विभागाच्या वरोरा नाक्याजवळील अतिविशिष्ट विश्रामगृहाच्या नुतणीकरणाचे हे काम आहे. यामागे एका विशिष्ट कंत्राटदाराला लाभ पोहोचविण्याचा हेतू असल्याचे समजते.

सार्वजनिक बांधकाम विभाग आपतकालीन परिस्थिती वगळता कोणत्याही कामाची आधी निविदा काढतो. त्यातील दर बघून निविदा मंजूर केली जाते. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर कंत्राटदार प्रत्यक्ष कामाला सुरूवात करतात. परंतु सार्वजनिक बांधकामाने शासनाच्या या नियमांना पायदळी तुडविले. आधी कंत्राटदाराला काम दिले. त्यानंतर निविदा काढली. जवळपास १६.५० हजार रुपयांचे हे काम आहे.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख Sandip Gireh यांनी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. कुंभे यांनी या कामाच्या कंत्राटदारासंदर्भात विचारणा केली . तेव्हा अधिकाऱ्यांनी सावरासावर सुरू केली. त्याच दिवशी म्हणजे २२ ऑक्टोंबरला ई – निविदा प्रकाशित केली. २ ९ आक्टोंबरला निविदा उघडली जाणार आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः निविदा काढली नाही. या कामात पीओपी, लाकडी बैठक व्यवस्था, रंगरंगोटी आणि इलेक्ट्रीक आदी कामांचा समावेश आहे. याकामासाठी कौशल्य प्राप्त मजुरांची गरज असते.

परंतु काम मजूर सहकारी संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आले. निविदेत स्पर्धा होऊ नये आणि काम विशिष्ट कंत्राटदारालाच मिळावे, यासाठी हा घोळ घातला आहे. या कामात मोठा गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करण्याची मागणी Sandip Gireh गिन्हे यांनी केली आहे.