कोरोना संकट काळात समाजात सामूहिक परोपकाराची व कृतज्ञतेची भावना : खासदार बाळू धानोरकर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वरोरा येथे कोरोना योध्यांचा सेवा गौरव कृतज्ञता सोहळा

चंद्रपूर : देशात यापूर्वी प्लेग, मलेरिया, कॉलरा सारखी संकटे येऊन गेली. परंतु कोरोना संकट काळात समाजासाठी निःस्वार्थ सेवा करण्याची, परोपकाराची व कृतज्ञतेची सामूहिक भावना प्रथमच पहावयास मिळाली, असे उद्गार खासदार बाळू धानोरकर यांनी काढले.

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेस प्रदेश सचिव विनोद दत्तात्रय यांची उपस्थिती होती.

यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. अंकुश राठोड, डॉ. बाळा मुंजनकर, डॉ. हेमंत खापणे, डॉ. प्रभाकर पिंपळकर, डॉ. मेहरदीप हटवार, नगरपरिषदेचे भूषण सालवटकर, उमेश ब्राह्मणे, महसूल विभागाचे उप विभागीय अधिकारी सुभाष शिंदे, पोलीस विभागातर्फे ठाणेदार दीपक खोब्रागडे व निलेश चवरे, ऍम्ब्युलन्स चालक, गांधी उद्यान योग मंडळ, रॉयल रायडर्स, स्वस्त धान्य दुकानदार संघ, मेडिकल असोसिएशन, वर्धा पॉवर, जीएमआर कंपनी, गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी, माता महाकाली कॉलेज इत्यादी समाजसेवी व्यक्तीनसह पन्नासहुन अधिक सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, धार्मिक प्रवृत्तीचे लोक ईश्वर आराधनेतून जो आनंद प्राप्त करतात तोच आनंद सर्वसामान्य लोक सेवेच्या माध्यमातून प्राप्त करू शकतात असे सांगून कोरोना काळात अनेक सेवाभावी संस्थांनी चांगले कार्य केले आहे. असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

याप्रसंगी लोकसत्ता चे संपादक देवेंद्र गावंडे म्हणाले कि, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण सारे लोक हे फेक अफवांचे बळी पडलो. जे मोबाईलवर धडकेत तो उपचार या काळात आपण केला. या काळात मोठ्या प्रमाणत अधोरी प्रचार देखील करण्यात आला. त्यामुळे पुढे हे या प्रकाराला बळी पडता कामा नये त्यामुळे सर्वानी तशी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. सोबतच पहिल्या व दुसऱ्या कोरोनाचा लाटेत शासकीय यंत्रणेचे ऑडिट होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे ऑडिट इंग्लंड मध्ये देखील झाले आहे. त्यामुळे या काळात पण कोणत्या चुका केल्या व समोर येणाऱ्या संकटात कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे. ते आपल्याला कळेल. या काळात चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा, भद्रावती येथे सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मोठी होती. या काळात येथील प्रशासन व पुढाऱ्यांनी हि परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. त्यांचे कार्य वाखाण्याजोगे असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, या मतदारसंघात सर्व नागरिकांनी कोरोना काळात कार्य केले. जीवाची पर्वा न करता सर्वांनी कार्य केले. यामध्ये त्यांनी महिलांचे देखील विशेष कौतुक केले. महिलांनी या काळात कोरोना रुग्णांना निशुल्क जेवण उपलब्ध करून दिल. अनेक ठिकाणी त्याकाळात खंबीरपणे उभ्या होत्या. या युद्धात लढणाऱ्या कोरोना योध्यांचे त्यांनी आभार म्हणून यापुढे मानवी आयुष्य वाचवण्यासाठी अशीच सेवा द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी सत्कारमूर्ती तर्फे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले यांनी केले. संचालन प्रा. प्रशांत खुळे तर आभार मिलींद भोयर यांनी मानले.