चंद्रपुरात क्रांतिवीर बिरसा मुंडांचा पुतळा हटवविला

0
378
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

आदिवासी बांधवांमध्ये संताप; उपोषणाचा इशारा

चंद्रपूर : रेल्वेस्थानकाजवळील बीएसएनएल कार्यालयाजवळ क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक आहे. मनपाने नामकरण केलेल्या या चौकात आदिवासी संघटना आणि समाजबांधवांच्या पुढाकारातून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्यात आला. मार्च महिन्यात लोकार्पणाची तयारीही सुरू होती. अशात शनिवारी (ता. 27) महापालिका प्रशासनाने पुतळा हटविला. यामुळे आदिवासी समाजबांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने त्याच जागेवर रीतसर पुतळा बसवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करून उपोषण केले जाईल, असा इशारा दिला आहे.

चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंडराजाचेही या जिल्ह्यात वास्तव्य होते. अनेक प्राचीन वास्तू, स्मारके या इतिहासाची साक्ष देतात. त्यामुळे चंद्रपूर शहरात आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे स्मारक, पुतळा उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून आदिवासी समाजातील विविध संघटना, समाजबांधवांच्या वतीने केली जात आहे.

त्यासोबतच शहरातील चौकांना महापुरुषांची नावे देण्याचीही मागणी केली होती. यासाठी अनेक आंदोलने झाली. धरणे देण्यात आले. महापौर, आयुक्तांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व मोठ्या अधिकारी, नेत्यांना निवेदने देण्यात आली.

त्यानंतर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने रेल्वेस्थानकाजवळील बीएसएनएल कार्यालयाजवळ क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी जागा आरक्षित केली होती. त्यानंतर आदिवासी समाजाने या चौकात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर समाजबांधवांनी आपापल्या परीने वर्गणी गोळा या चौकात मागील आठवड्यात पाच फुट उंचीचा पुतळा उभारला.