विद्यार्थ्यांची कोंबून वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई होणार

0
193
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

तहसीलदार हरीश गाडे यांचे गट शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश

राजुरा (चंद्रपूर) : कोरोना संकटात शाळांना सुरुवात झाल्यानंतर शासनाचे नियम पाळीत शाळा भरविण्याचे आदेश आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेत सोशल डिस्टन्स, मास्क आणि नियमित हात स्वच्छ धुऊन याबाबत पुरेशी काळजी घेण्याचे शाळांना निर्देश आहेत. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर खाजगी वाहनातून, स्कूल बसेस, ऑटो मधून विद्यार्थ्यांना कोंबून शाळेत जात आहे. सोशल डिस्टंसिंगच फज्जा उडाला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय धोकादायक असल्यामुळे तहसीलदार हरीश गाडे यांनी तात्काळ गट शिक्षणाधिकारी यांना आदेश दिले आहेत. वाहतूक करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.

दिवाळीनंतर इयत्ता पाचवी ते महाविद्यालयीन वर्ग सुरू झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या शालेय उपस्थितीबाबत पालकांकडून हमीपत्र घेण्यात आलेले आहेत मात्र विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या संदर्भात शासनाच्या नियमांचे सर्रास पायमल्ली होत आहेत. खाजगी वाहनातून विद्यार्थ्यांची कोम्बुन वाहतूक सुरू आहे याकडे शिक्षण विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे.कोरोणा संसर्गासाठी ही स्थिती धोकादायक ठरू शकते. यासाठी तहसीलदार हरीश गाडे यांनी सक्तीने शासनाचे नियम पालन करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालकांनी स्वतः जबाबदारीने पोहोचवण्याचे हमीपत्र घेण्यात आलेले आहे. मात्र पालकांच्या हमीपत्रावर शाळानी सर्रास स्कूल बसेस खाजगी, ऑटो व वाहने सुरू केलेली आहेत. इयत्ता 5 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोंबून शाळेमध्ये ने आण करणे सुरू आहे. सोशल डिस्टंसिंग चा फज्जा वाहतुकीतून उडालेला आहे. स्कूल बसेस आणि खाजगी वाहनातून कुठलेही सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येत नसल्याचे चित्र आहे. छोट्या शाळकरी मुलांना कोंबून वाहतूक सुरू असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो .ग्रामीण भागातील विद्यार्थी शहराकडे शिक्षणासाठी येत असल्यामुळे संसर्गाचा धोका वाढलेला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांची कोंबून होणारी वाहतूक यावर शिक्षण विभाग व परिवहन विभागाचे हि लक्ष नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्याशी खेळ सुरू आहे. शाळाना शासनाने वेळोवेळी सूचना दिल्यानंतर नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार थांबवण्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गोडे यांनी कठोर पावले उचललेली आहेत.