चोरा शेतशिवारातील त्या घरात वृद्ध दाम्पत्याची हत्याच

0
239

• वृद्ध दाम्पत्याचा आठ महिन्यापूर्वी आढळला होता मृतदेह
• पोलिसांना संशय; खुनाचा गुन्हा दाखल, सशंयीत आरोपींचा शोध सुरू

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील चोरा येथील शेतशेतातील घरात आठ महिण्यावूर्वी कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या एका वृद्ध पती पत्नी दाम्पत्यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी शनिवारी (27 मार्च 2021) खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील संशयीत आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेचा तब्बल आठ महिन्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनात केल्याने आसुटकर दाम्पत्यांच्या हत्येप्रकरणातील गुन्हेगारांचा शोध लवकर लागेल का? असा प्रश्न विचारला जात आहे.

भद्रावती तालुक्यातील मृतक गजानन आसुटकर (वय 62) व शीला असुटकर (वय 55) आदी पती पन्ती वृध्ददारम्पत्यांचा मृतदेह चोरा गावापासून दोन किमी अंतरावरील शेतातील घरात आढळून आला होता. या शेतातील घरात दोघेही पती, पत्नी वृध्द दाम्पत्य राहत होते. त्यांची चार भद्रावती येथे राहतात, व्यवसायाने ते नौकरीवर आहेत. आठ महिण्यापूर्वी 28 जुलैला या वृध्द दरम्पत्यांचा खाटेवर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. होता. पोलिसांच्या सहकार्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे शवविच्छेदन जागेवर म्हणजे घटनास्थळावरच केले होते.

वृध्द दाम्पत्यांचा मुलगा प्रदिप आसुटकर व शरद आसुटकर यांनी, माझ्या आईवडिलांचा मृत्यू हा आकस्मिक किंवा आत्महत्या नसून येथील काही संशयितांनी त्यांची हत्या केली असा आरोप केला होता. त्यांनतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

एकाच वेळेस दोघांचा अकस्मात मृत्यू होणे हे पोलिसांना संशयीत स्वरूपाचे वाटत असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलिसांनी आज रविवारी आसुटकर वृध्द दाम्पत्यांच्या मृत्यू प्रकरणात हत्येचा गुन्हा 26 मार्च ला (शनिवारी) दाखल केला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू आहे. या घटनेचा तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि सुधीर वर्मा करीत आहे.